Pune Lockdown | पुणेकरांना दिलासा मिळणार?; पुणे पालिकेनं राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, राजेश टोपे, सचिव कुंटे यांच्यात बैठक

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Lockdown । राज्य सरकारने (State Government) नुकतंच राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला. मात्र उर्वरित 11 जिल्ह्यात परिस्थितीनुसार तेथील निर्बंध कायम ठेवण्यात आहेत. नियमानुसार 25 जिल्ह्यातील दुकानांच्या वेळा आता वाढवण्यात आल्या आहेत. मात्र, ज्या 11 जिल्ह्यात निर्बंध शिथिल केले नाहीत. त्यात पुण्याचा देखील नंबर आहे. विशेष म्हणजे पुणे (Pune) शहरातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) कमी असतानाही येथील निर्बंध शिथिल का नाही? मोठ्या राज्यात रात्री 10 पर्यंत दुकानांना शासनाकडून मुभा दिलीय. परंतु पुण्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी असतानाही येथील निर्बंध (Pune Lockdown) कायम ठेवण्यात आले आहेत. यावरून पुणेकरांनी आणि पालिका सत्ताधाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी देखील निर्बंधाबाबत नाराजी व्यक्त केलीय. मात्र, याबाबत आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

पुण्याच्या निर्बंधाबाबत (Pune Restrictions) राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे (Chief Secretary Sitaram Kunte)
यांची पुणे लॉकडाऊन नियमावली यावर चर्चा झाल्याचं समोर आलं आहे.
जर पुणे महानगरपालिकेला (Pune Municipal Corporation) सध्याच्या कडक नियमावलीमध्ये मुभा हवी असेल तर पुणे महापालिकेने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावा अशा स्वरूपाची भूमिका
आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी घेतली आहे.

 

 

काल (बुधवारी) रात्री झालेल्या बैठीकीदरम्यान पुणे महापालिकेला सध्याच्या कडक नियमावलीत सूट देण्याबाबत चर्चा झाल्याचे टोपे यांनी म्हटलं आहे.
पुढे टोपे म्हणाले की, पुणे महापालिकेने राज्य सरकारकडे सूट मिळावी यासाठी प्रस्ताव पाठविल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय मुख्यमंत्री (CM) घेतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

या दरम्यान, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे
(Health Minister Rajesh Tope) यांच्यात एक बैठक पार पडली.
त्यावेळी अशी भूमिका घेण्यात आली आहे.
विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार
(Ajit Pawar) यांनी भूमिका घेण्याऐवजी खुद्द आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भूमिका घेतली आहे.
दरम्यान, या भूमिकेमुळे सध्या राज्यात पुणे महापालिकेला कडक नियमावली तून भविष्यात
सूट मिळणार का याकडे आता सर्व पुणेकरांचे लक्ष लागून आहे.

 

Web Title : Pune Lockdown | important information of health minister rajesh tope about unlock in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | मोदी सरकार 2.0 साठी खास आहे 5 ऑगस्ट, यावेळी सुद्धा विरोधकांना देणार का आश्चर्याचा धक्का?

Pune Corporation | चार वर्षात ठेकेदारांच्या टँकरच्या फेर्‍या झाल्या ‘दुप्पट’ ! पुण्यामध्ये दिवसेंदिवस पाणी टंचाई वाढतेय की पालिकेलाच लागलीय ‘गळती’

Tokyo Olympics | हॉकीतील 4 दशकाचा दुष्काळ समाप्त ! भारताने जर्मनीवर 5-4 ने मात करुन ‘कांस्य’ पटकाविले