Pune Lockdown : पुण्यात अनलॉक? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत, सोमवारी होऊ शकतो निर्णय !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोना रुग्णवाढीचा दर लक्षात घेउन लॉकडाउन Pune Lockdown शिथिल करण्याबाबत सोमवारनंतर निर्णय घेण्यात येईल. तर आषाढी वारीबाबतही लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. विधानभवन येथे झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले, राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. बर्‍याच जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा दर कमी होत आहे. आम्ही दररोज रुग्णवाढीच्या दराचा अभ्यास करत आहोत. पुढील दोन दिवसांतील रुग्णवाढीचा दर पाहून सोमवारी लॉकडाउन Pune Lockdown शिथील करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. राज्यातील अनलॉकचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतीय, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर सरकारी रुग्णालयात मोफत उपचार होत आहेत.

परंतू आज राज्य शासनाने खाजगी खाजगी रुग्णालयातील उपचादारांचे दर निश्‍चित केले आहेत.

या आजारांवरील उपचारासाठी २२ लाखांपर्यंत खर्च येत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहे. यातून दिलासा देण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला.

राज्यात Lockdown की Unlock ! मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

या रोगावरील औषधांची टंचाई आहे, ही वस्तुस्थिती असल्याचेही पवार यांनी यावेळी नमूद केले.

कोरोना उपचारावरील औषधे आणि साहित्यावरील किंमतीवर जीएसटीतून सूट देण्याबाबतची भुमिका जीएसटी काउंसीलसमोर मांडली आहे.

या समितीचे अध्यक्ष याबाबत लवकरच निर्णय घेतील, यातूनही सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

COVID-19 : कोरोनाची ‘सौम्य’ लक्षणे गंभीर संसर्गात बदलण्यापासून रोखण्यासाठी ‘या’ चुका टाळा, जाणून घ्या

आषाढी वारीबाबत पालखी प्रमुखांनी किमान ५० वारकर्‍यांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याला परवानगीची मागणी केली आहे.

परंतू वारकरी जरी ५० असले तरी पालखी मार्गावर दर्शनासाठी होणारी गर्दी रोखणे अवघड होणार आहे.

परंतू याबाबतही पालखी मार्गावरील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस प्रमुख आणि पालखी सोहळा प्रमुखांनी एकत्रित बसून पुन्हा चर्चा करावी, अशी सूचना विभागीय आयुक्तांना दिली आहे.