Pune Lok Adalat | लोक अदालतमधून तब्बल 396 कोटी रुपयांचे तडजोड शुल्क वसूल; लाखो दावे काढले निकालात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lok Adalat | पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे (National Lok Adalat) आयोजन करण्यात आले होते. यावेळी एक लाखाहून अधिक प्रलंबित दावे निकाली काढण्यात आले आहेत. प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे (District Legal Service Authority Pune) अध्यक्ष श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामधून 396 कोटी 2 लाख 99 हजार 200 रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले असून अनेकांसाठी ही लोक अदालत महत्त्वपूर्ण ठऱली आहे. या लोक अदालतमध्ये दाखलपूर्व दावे निकाला काढण्यासाठी 133 पॅनेल नियुक्त करण्यात आले होते. यामधून कोट्यवधी रुपये वसूल करण्यात आले असून लाखो दावे निकाली काढण्यात आले.

निकालासाठी नियुक्त करण्यात आलेल्या 133 पॅनलची संख्या ही राज्यभरामध्ये सर्वात जास्त होती. दाखलपूर्व दोन लाख 16 हजार 86 दावे लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आले होते. त्यापैकी 79 हजार 956 दाव्यांचा निकाल लावण्यात आला. यामधून तब्बल 76 कोटी 21 लाख 94 हजार 253 रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. तसेच प्रलंबित 72 हजार 477 प्रकरणे होती. यामधून 30 हजार 236 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यातून 319 कोटी 81 लाख 4 हजार 947 रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. अशी माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली आहे. (Pune Lok Adalat)

सोनल पाटील म्हणाल्या की, “प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीत पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने राज्यात सर्वात जास्त दावे निकाली काढण्याची परंपरा जपली आहे. लोकअदालतीच्या आयोजनात जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, पोलीस, तसेच नागरिकांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.”

या लोक अदालतीमध्ये अनेक प्रकारचे लाखो गुन्हे आणि दावे निकाली काढण्यात आले.
लोक अदालतमध्ये सर्वांत जास्त पाणी कर आणि फौजदारी गुन्हांचे दावे निकाली काढण्यात आले.
तडजोड पात्र फौजदारी गुन्हे 29,385 दावे तर पाणी कर 68,180 दावे निकाली काढण्यात आले.
तसेच बँकेची कर्जवसुली 3,552, धनादेश न वटणे 2,212, वीज देयक 157 आणि
भूसंपादन 103 असे दावे निकाली काढण्यात आले. सोबतच कामगार विवाद खटले 71,
मोटार अपघात दावे न्यायाधिकरण 146, वैवाहिक विवाद 285, अन्य दिवाणी दावे 924, ग्राहक विवाद 18 आणि अन्य दावे 5,186 अशा प्रकारचे एकणू 1 लाख 10 हजार 192 दावे लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Atul Bhatkhalkar | भातखळकर यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले – ’40 आमदार मराठीत काय बोलत होते…’

Manoj Jarange On Prithviraj Chavan | पश्चिम महाराष्ट्राने काय घोडं मारलं आहे? पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रश्नावर मनोज जरांगेंचा संताप; म्हणाले – “निजाम घेऊन जायचा…”

Girish Mahajan | भाजप नेते गिरीश महाजनांचे मराठा आरक्षणाबाबत मोठं सुचक वक्तव्य; म्हणाले, “असे आऱक्षण…”