Pune Lok Adalat | ‘न्याय आपल्या दारी’ संकल्पनेतून 9 सप्टेंबर रोजी ‘राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

वाहतूक पोलिसांच्या ‘हेल्पडेस्क’ला नागरिकांचा मोठा प्रतिसाद, 5 हजार 877 नागरिकांकडून दंडाच्या चलन रक्कमेत तडजोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lok Adalat | वाहतूक शाखेच्या येरवडा येथील वाहतूक शाखेच्या (Pune Traffic Police) कार्यालयात 28 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत सुरू केलेल्या मदत कक्षाला (हेल्पडेस्क- Pune Police Helpdesk) नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळला आहे. गेल्या 10 दिवसांत 5 हजार 877 वाहनचालकांनी उपस्थित राहून त्यांच्या दंडाच्या चलनाच्या रक्कमेत (Traffic Penalty Amount) तडजोड केली आहे. तर प्रलंबित चलन केसेसचा निपटारा करण्यासाठी येत्या 9 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पासून राष्ट्रीय लोक अदालतीचे (Pune Lok Adalat) आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे (District Legal Services Authority Pune) यांनी ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेद्वारे नागरिकांना कोर्टात येवून झगडून न्याय मिळवण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी तात्काळ तंटा मिटवण्याच्या उद्देशाने या राष्ट्रीय लोकअदालतीचे (Pune Lok Adalat) आयोजन करण्यात आले आहे. येरवडा येथील वाहतुक शाखेच्या पोलीस उपायुक्त कार्यालयात (Pune Traffic DCP Office Yerwada) लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर 28 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत मदत कक्ष (हेल्पडेस्क) सुरु करण्यात आला होता.

वाहतूक शाखेच्या वतीने न्यायालयाकडून नागरिकांना मोठ्या प्रमाणात समन्स बजावणी करण्यात आलेली आहे. या समन्सचा निपटारा लोक अदालतीमध्ये करण्यात येणार आहे. या लोक अदालतमध्ये येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे व प्रशासन यांनी विशेष काळजी घेतली आहे. लोक अदालतीच्या खटल्याचा निपटारा कमीत कमी वेळेत होऊन नागरिकांचा वेळ वाचावा या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

लोक अदालत मध्ये जास्तीत जास्त खटल्यांचा तडजोडीद्वारे तात्काळ निपटारा करण्यासाठी
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या मार्फत 19 न्याय दंडाधिकारी व त्यांचे सहकारी यांचे 19 डेस्क तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे खटल्यांचा जलद गतीने निपटारा होण्यास मदत मिळणार आहे.

9 सप्टेंबर रोजी होत असलेल्या लोक अदालतीमध्ये येणाऱ्या नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्यासाठी
टोकन पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे.
प्रथम येणाऱ्या नागरिकांचे खटले तातडीने बोर्डावर घेतले जाणार आहेत.

हेल्पडेस्क मध्ये नागरिकांना 50 टक्के सवलत तडडोडीने न्यायालयाकडून देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये देखील अशाच प्रकारे सवलत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण
व न्यायदंडाधिकारी यांच्याकडून मिळू शकते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार अ‍ॅक्शन मोडवर,
10 लाखाची लाच घेणार्‍या बडया अधिकार्‍याची हकालपट्टी