Pune Lok Sabha Banner- Jagdish Mulik | गणेशोत्सवाच्या शुभेच्छा की खासदारकीची तयारी? पुण्यातील भाजपच्या नेत्याची फलकबाजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- Pune Lok Sabha Banner- Jagdish Mulik | खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर (Late MP Girish Bapat) रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवणुकीबाबत अद्याप काहीही स्पष्टता नाही. मात्र खासदारकीचे तिकीट मिळण्यासाठी भारतीय जनता पक्षात चढाओढ सुरू झाल्याचे दिसून येत आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Pune Lok Sabha Banner- Jagdish Mulik) यांनी गणेशोत्सवात लावलेल्या बॅनरवरुन लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत.

पुण्यात सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक गणेश भक्त आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहे. याच संधीचा फायदा घेत अनेक नेत्यांनी 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्यातील भाजप नेत्यांकडून उमेदवारीवर दावा करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे नेते आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी गणेश भक्तांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपला भावी खासदार म्हणून संदेश पोहोचवण्याचे काम मुळीक यांच्याकडून केले जात आहे. त्यामुळे मुळीक यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. (Pune Lok Sabha Banner- Jagdish Mulik)

कधीही निवडणूक लागू द्या…

पोटनिवडणूक घ्यायची की नाही हा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. निवडणुकीच्या बाबतीत सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही. पुण्यात कधीही निवडणुक होऊ द्या. आम्हीच निवडून येऊ, असा दावाही जगदीश मुळीक यांनी केला आहे. पुणेकर सुज्ञ आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात आणि महत्त्वाचं म्हणजे पुण्याच्या विकासासाठी भाजप कायमच प्रयत्नशील असतं, हे पुणेकारांना चांगलं माहित आहे, असेही ते म्हणाले.

यापूर्वीही लागले होते फलक

गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर जगदीश मुळीक यांच्या समर्थकांनी मुळीकांचे भावी खासदार म्हणून बॅनर्स लावले होते.
संपूर्ण पुणे शहरात त्यांनी बॅनर लावले होते. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या या बॅनरवर भावी खासदार म्हणून
उल्लेख करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
त्यानंतर गणेशोत्सवात गणेश भक्तांच्या स्वागताचे बॅनर्स मुळीक यांनी लावले असून त्यावर नवीन संसद भवनाचा फोटो छापला आहे.

भाजपचे अनेक नेते इच्छुक

पुण्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपचे अनेक नेते इच्छुक आहेत.
लोकसभेसाठी गिरीश बापट यांच्या परिवारातून स्वरदा बापट यांचे नाव आगामी उमेदवार म्हणून घेतले जात आहे.
माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुळकर्णी, माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sandeep Khardekar | महायुतीच्या समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती