Pune Lonikand Crime | गहाण ठेवलेले दागिने घेऊन सराफ झाला फरार; वाघोलीतील अनेकांची केली फसवणूक

पुणे : केसनंद ते राहु रोडवरील शिरसवडी येथे त्याने महालक्ष्मी ज्वेलर्स (Mahalakshmi Jewellers) नावाने सराफी दुकान सुरु केले. लोकांना नविन दागिने बनवून देतो, असे सांगून त्यांच्याकडील जुने दागिने व पैसे घेतले. दागिने गहाण ठेवून उसने पैसे दिले, त्यानंतर तो सर्व काही घेऊन फरार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Lonikand Crime)

याबाबत अमोल कुंडलिक पायगुडे (वय ३२, रा. पायगुडे वस्ती, वाडेबोल्हाई, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७५/२४) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नितीन सुभाष क्षीरसागर (रा. शिवरकर वस्ती, वाघोली, मुळ रा. कुरंदा, ता. वसमत, जि. हिंगोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आईने ४ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या व ८० हजार रुपये हे ५ तोळे वजनाच्या बांगड्या बनविण्यासाठी डिसेबरमध्ये आरोपी क्षीरसागरकडे विश्वासाने दिल्या. परंतु, क्षीरसागरने नवीन बांगड्या बनवून दिल्या नाहीत. तसेच गावातील काही लोकांनी आरोपीकडे सोन्याचे दागिने देऊन दागिन्यांच्या किंमतीपेक्षा कमी पैसे उसने घेतले. लोकांचे हे दागिने घेऊन क्षीरसागर दुकान बंद करुन फरार झाला आहे. अनेक दिवस वाट पाहिल्यानंतर लोकांनी आता पोलिसांकडे धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक गोडसे तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले

पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्‍हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक