Pune Mahavitaran News | धोकादायक परिस्थितीत चोख कामगिरी; महावितरणचे अभियंता, कर्मचाऱ्यांचा गौरव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Mahavitaran News | निगडीमधील भक्ती-शक्ती चौकात एलपीजी गॅसचा टँकर उलटल्यानंतर संभाव्य धोका टाळण्यासाठी महावितरणचे सहायक अभियंता संतोष झोडगे (antosh Zodge) व सहकाऱ्यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) आयुक्त शेखर सिंह (IAS ias Shekhar Singh) यांच्याहस्ते पालिकेच्या सभागृहात नुकताच गौरव करण्यात आला. (Pune Mahavitaran News)

निगडीमधील कै. मधुकरराव पवळे पुलाजवळ मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जाणारा भारत पेट्रोलियमचा एलपीजी गॅस टँकरला पहाटे अपघात झाला होता. टँकरमध्ये १८ टन गॅस असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी पोलीस विभागाकडून महावितरणला वीजपुरवठा बंद करण्याबाबत कळविण्यात आले. त्यानुसार महावितरणकडून निगडी गावठाण, सेक्टर २४ व २६ तसेच साईनाथनगर परिसरातील पहाटे पाच वाजता चार रोहित्रांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. तसेच सहायक अभियंता संतोष झोडगे तसेच प्रशांत माळोदे, जितेंद्र सारंगधर, गोपाळ गिरी, किरण नलगे हे सर्व जनमित्र त्याच ठिकाणी दिवसभर उपस्थित राहून कर्तव्य बजावले होते. सुदैवाने सर्व यंत्रणेच्या योग्य समन्वयामुळे अपघातग्रस्त टँकरपासून मोठा धोका टळला. महावितरणच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याहस्ते सहायक अभियंता संतोष झोडगे यांचा गौरव करण्यात आला. (Pune Mahavitaran News)

Web Title :  Pune Mahavitaran News | Excellent performance in dangerous situations; Mahavidran’s engineers, employees’ pride

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा