Pune : मंगलदास बांदल यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, सुनावली 4 दिवसांची पोलीस कोठडी; जाणून घ्या कोर्टात काय झालं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  फसवणुकीच्या गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल(Mangaldas Bandal) यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे.  मंगलदास बांदल(Mangaldas Bandal) यांना आज (गुरुवार) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने बांदल यांना एक जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

शिक्रापूर पोलिसांनी मंगलदास बांदल, जिल्हा परिषद सदस्या रेखा मंगलदास बांदल, गोविंद शंकर झगडे, मोहन जयसिंग चिखले (सर्व रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांच्यासह एका अनोळखी इसमावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शिक्रापूर येथील दत्तात्रय रावसाहेब मांढरे यांच्या जागेतील गाळ्यांचे बनावट व्यक्ती उभी करून बोगस गहाणखत बनवून शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे तब्बल एक कोटी पंचवीस लाख रुपये कर्ज काढून बँकेचे कर्ज न भरता दोन कोटी पन्नास लाख रुपये थकवून फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना अटक केली. त्यांनतर आज मंगलदास बांदल यांना शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने मंगलदास बांदल यांचा जामीन नामंजूर करत त्यांना एक जून 2021 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे हे करत आहे.

ज्यावेळी मंगलदास बांदल यांना पोलिसांनी अटक करून शिरूर येथील कस्टडीत ठेवण्यात आले. त्यावेळी या गुन्ह्यातील सह आरोपी रेखा बांदल व मोहन चिखले शिरुर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये शिक्रापूर पोलिसांच्या समोर हजर असल्याचे बोलले जात आहे याचे चित्रकरण देखील शिरुर पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेरे झाले आहे. मात्र जी तत्परता मंगलदास बांदल यांना अटक करण्यात दाखवली तिच तत्परता इतर आरोपींना अटक करण्यात का दाखवली नाही ? असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

सदर गुन्ह्यातील अटक आरोपी नामे मंगलदास बांदल यास आज रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी घोड नदी शिरूर यांचे कोर्टात रिमांड कामी हजर केले. मा. न्यायाधीश श्रीमती करवंदे मॅडम यांनी तपासी अधिकारी श्री हेमंत शेडगे व सहायक सरकारी वकील श्री महाले यांचे म्हणणे व आरोपीचे वकील यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सदर आरोपीस दिनांक 01.06.2021 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. सदरचा गुन्हा हा आर्थिक गैरव्यवहारा संबंधीचा असून त्यासंबंधीचे कागदोपत्री पुरावे गोळा करणे सुरू आहे. जसे जसे पुरावे मिळतील त्याप्रमाणे सहभागी आरोपींविरुद्ध आवश्यक कारवाई करण्यात येईल.

Immune Weakening Foods : तुम्ही तुमची इम्युनिटी कमजोर तर करत नाही ना? जाणून घ्या असे 4 फूड्स ज्यामुळे आजारी पडू शकता

मुक्ताईनगर पंचायतीत एकनाथ खडसे गटाला खिंडार; 6 नगरसेवक शिवसेनेत

Lockdown in Maharashtra : महाराष्ट्रातील लॉकडाऊन 1 आठवडयानं वाढणार? मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज निर्णय होण्याची दाट शक्यता

1 जूनपासून बदलणार हे नियम, ज्यांचा होईल तुमच्यावर परिणाम; बँक व्याजदर आणि एलपीजीच्या दरात सुद्धा होणार का बदल?