Pune Marathi News | भारती विद्यापीठ आयएमईडीच्या ‘सहयोग 2024’ मेळाव्यास प्रतिसाद

पुणे : Pune Marathi News | भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट(आयएमईडी)च्या माजी विद्यार्थ्यांच्या ‘सहयोग २०२४’ या मेळाव्यास शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला.’आयएमईडी’चे प्रभारी संचालक डॉ.अजित मोरे,उपप्राचार्य डॉ.रामचंद्र महाडिक,प्रा.दीपक नवलगुंद,प्रा.दीप्ती देशमुख,पूजा घोणे आदी मान्यवर उपस्थित होते.पौड रस्ता येथील भारती विद्यापीठ कॅम्पस मध्ये शनिवार,दि.६ जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता हा कार्यक्रम झाला.

यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्पोरेट क्षेत्रात उच्च पदांवर काम करणारे मान्यवर माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.त्यातील काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ .प्रवीण माने यांनी दीर्घ काळ कार्यरत असलेल्या आयएमईडी अल्युमनी असोसिएशनच्या उपक्रमांची माहिती दिली. आयएमईडीच्या सर्व प्राध्यापकांचा सहभाग या मेळाव्याच्या आयोजनात होता.कार्पोरेट,उद्योग,माहिती तंत्रज्ञान, मनुष्यबळ विकास क्षेत्रात उच्च पदावर असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी सध्या आयएमईडी मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या आजी विद्यार्थ्यांना प्लेसमेंट आणि करिअर साठी मार्गदर्शन केले. (Pune Marathi News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Ravindra Dhangekar | दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत कधी देणार ? आमदार रवींद्र धंगेकर यांचा सवाल

Pune Marathi News | औंध स्मशानभूमी सुधारणांसाठी 50 लाखांच्या कामांना प्रारंभ – आ. सिद्धार्थ शिरोळे

आशानगर येथील पाण्याच्या टाकीची पाहणी ! लवकरच उद्घाटन होईल – आ. सिद्धार्थ शिरोळे

NCP MLA Rohit Pawar | रोहित पवारांचा निशाणा अजित पवारांवर आणि सवाल भाजपाला, ”ज्या नेत्यांवर आरोप केले त्यांच्यावरील कारवाईचं काय?”

Pune Accident News | दुचाकीस्वार रायडरची शाळकरी मुलांच्या दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू; दौंड तालुक्यातील घटना