MLA Ravindra Dhangekar | दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत कधी देणार ? आमदार रवींद्र धंगेकर यांचा सवाल

मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मांडली बळीराजाची वेदना; दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी पॅकेज जाहीर करण्याची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – MLA Ravindra Dhangekar | जवळजवळ निम्मा महाराष्ट्र सध्या दुष्काळाने होरपळत आहे. पाण्याची चणचण भासू लागली आहे. शेतकरी बांधव कमालीचा अस्वस्थ झाला आहे. निराश झाला आहे. पण, सरकारने अद्याप दुष्काळग्रस्त भागातील बळीराजाला, नागरिकांना मदत दिली नाही आणि त्यांच्यापर्यंत दुष्काळग्रस्तांसाठीच्या सुविधाही पोहचवल्या नाहीत, याकडे सरकारचे लक्ष वेधत ‘दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत कधी देणार’, असा सवाल काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज उपस्थित केला. (MLA Ravindra Dhangekar)

सरकारने ४० तालुक्यात आणि सुमारे १२०० महसूल मंडलात दुष्काळ जाहीर केला आहे. पण, कुठलीही उपाययोजना या भागात अद्याप केली नाही आणि दुष्काळग्रस्तांना अद्याप आर्थिक मदतही दिली नाही. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे. दुष्काळग्रस्तांना मदत देण्याची कार्यवाही तत्काळ करावी, अशी मागणी केली आहे. (MLA Ravindra Dhangekar)

आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, यंदा वरुणराजाने पाठ फिरवल्याने राज्याच्या अनेक भागात दुष्काळाची स्थिती आहे. पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ जनतेवर आली आहे. देशाची भूक भागविणारा, काळ्या आईशी इमान राखणारा शेतकरीबांधव संकटात सापडला आहे. पण, सरकारतर्फे कुठलीही मदत दुष्काळग्रस्त नागरिक, शेतकरी बांधव यांच्यापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे दुष्काळाशी सामना करणारी जनता प्रचंड अस्वस्थ आणि सरकारवर कमालीची नाराज असल्याचे पहायला मिळत आहे.

शेतकरी बांधवांवर सातत्याने एकामागून एक संकटे कोसळत आहेत. कधी पावसात खंड तर कधी गारपीट यामुळे
खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचा पैसा आणि श्रम दोन्ही डोळ्यादेखत वाहून गेले. पाण्याअभावी रब्बीसुद्धा संकटात सापडली आहे. तर दुसरीकडे, अनेक संकटापासून वाचविलेल्या धान्याला बाजारात मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे नेमके जगावे कसे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे, असे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

सरकारने राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. मात्र, जिथे सत्ताधारी पक्षाचा प्रभाव आहे, तीच तालुके सरकारने
निवडली, अशी टीका झाल्यानंतर १,२०० महसूल मंडल हे दुष्काळग्रस्त म्हणून सरकारने जाहीर केले.
या घोषणेला बरेच दिवस झाले. पण, अद्याप एक नवा पैसा दुष्काळग्रस्तांना मिळाला नाही.
दुष्काळाच्या सुविधाही मिळाल्या नाहीत, अशी सध्याची स्थिती आहे.
दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी पॅकेज जाहीर करून त्यांना आर्थिक मदत द्यावी.
शासकीय सुविधा तातडीने द्याव्यात. पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा.
जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी यावेळी केली.

लोकांसाठी धावून जाते तेच जनतेचे सरकार असते

जे सरकार जनतेचे प्रश्न सोडवते, सर्वसामान्यांच्या-शेतकऱ्यांच्या हाकेला ओ देत धावून जाते, ते सरकार खऱ्या अर्थाने
जनतेचे सरकार असते. पण, सध्याच्या सरकारला सर्वसामान्य लोकांकडे, शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळच नाही.
त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला आहे, अशी खंत आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंची सध्याच्या राजकारणावर चौफेर फटकेबाजी! ”नेते लाचार, मिंधे, पैशासाठी वेडे झालेत”

पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या व्यावसायिकावर FIR

MNS Chief Raj Thckeray | राज ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल, ”आत्ताचं सरकार म्हणजे सहकार चळवळ नाही, ती ‘सहारा’ चळवळ”

Sharad Mohol Murder Case | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळचा गोळया झाडून खून करणार्‍यांच्या काही तासात गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, आरोपींमध्ये 2 वकिलांचा समावेश (व्हिडीओ)