Pune Market Yard Crime | डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : Pune Market Yard Crime | जुन्या भांडणाच्या कारणावरुन टोळक्याने तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला.

याबाबत संतोष वामन भरेकर (वय ३७, रा. संत ज्ञानेश्वरनगर, काकडे वस्ती, कोंढवा) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३७/२४) दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी ऋतिक मोहोळ आणि ओम प्रताप पवार (रा. हमालनगर, मार्केटयार्ड) यांना अटक केली आहे. तर त्यांचे साथीदार नयन मोहोळ, निखील बाबर यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मार्केटयार्डमधील गंगाधाम फेज २ मध्ये शुक्रवारी रात्री साडदहा वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यात यापूर्वी भांडणे झाली होती. फिर्यादी हे गंगाधाम येथे आले असताना टोळक्याने जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्यांच्यावर धारधार हत्याराने डोक्यात वार करुन त्यांना गंभीर जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक एस पी जाधव तपास करीत आहेत.

रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले

पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्‍हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक