Pune Marketyard Crime | तरुणाला जीवे मारण्याची धमकी, शस्त्रधारी टोळक्याकडून मार्केट यार्ड परिसरात दहशत; 8 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Marketyard Crime | पुणे शहरातील मार्केट यार्ड भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसरात टोळक्याने कोयते, तलवार उगारून दहशत माजवल्याची घटना शनिवारी (दि. 30 मार्च) रात्री सव्वा नऊच्या सुमारास गल्ली नंबर 17 मध्ये घडली आहे. टोळक्याने एका तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिली (Death Threat). तसेच परिसरातील घरांच्या दरवाजावर कोयते मारुन शिवीगाळ केली. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी (Marketyard Police Station) तीन सराईत गुन्हेगारांसह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.(Pune Market Yard Crime)

राहुल उर्फ लल्या कांबळे (वय -19), शुभम कांबळे (वय -20), डुई ताकतोडे (वय -21), जग्या (चौघे रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, मार्केट यार्ड) यांच्यासह तीन ते चार साथीदारांविरुद्ध आयपीसी 427, 506, 504, 143, 144, 147, 148, 149 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमीनल लॉ अमेंन्डमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अरशद इस्माईल बागवान (वय-19 रा. गल्ली नं. 17, आंबेडकर नगर, मार्केट यार्ड) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात रविवारी (दि.31) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या भावाचे आरोपींसोबत भांडण झाले होते.
याच भांडणाचा राग मनात धरुन आरोपी हातात कोयते, तलवार घेऊन फिर्यादी यांना मारण्यासाठी त्यांच्या घराजवळ आले.
त्यांनी हातातील तलवार व कोयते उगारले. तसेच लोकांच्या घराच्या दरवाजावर कोयते मारुन आम्ही आंबेडकरनगरचे
भाई आहोत कोण मध्ये येईल त्याला तोडतोच असे म्हणून तोडफोड करुन दहशत पसरवली.

आरोपींनी फिर्यादी यांच्या घराजवळ येऊन त्यांच्या वडिलांना कोयता दाखवून शिवीगाळ केली.
तसेच शेजारी राहणारे शालम शेख यांच्यावर तलवार उगारली. घटनेची माहिती मिळता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे (API Madan Kamble)
तपास करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Court News | WhatsApp द्वारे हॉटेलमध्ये चालवल्या जाणाऱ्या बालेवाडी येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट मधील आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

Supriya Sule On BJP | सुप्रिया सुळेंचा भाजपावर गंभीर आरोप, भाजपाने आमचे घर फोडले, मोठ्या भावाची बायको आईसारखी…

Chhagan Bhujbal | छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा लढवणार?

Maharashtra Sadan Scam | महायुतीला धक्का! अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ अडचणीत? उद्यापासून सुरू होणार ‘या’ प्रकरणाची सुनावणी