Pune Market Yard News | मार्केट यार्डात ट्रक चालकाला चाकूच्या धाकाने लूटले, सराईत गुन्हेगार गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मार्केट यार्डातील केळी मार्केट (Pune Market Yard News) समोरील पार्किंगमध्ये ट्रक चालकाला चाकूचा धाकाने लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना सोमवारी (दि.19) सकाळी आठच्या सुमारास घडली आहे.

याबाबत किशोर भागचंद रोमण (वय-31 रा. मु.पो. पोवळवाडी, ता. पाथर्डी जि. अहमदनगर) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन प्रकाश देवराम परिहार उर्फ पक्या (रा. गल्ली नं. 1, राम मंदीराजवळ, लोहियानगर, पुणे) याच्यावर आयपीसी 394 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर रोमण मार्केटयार्डातील फळ बाजारात शेतीमाल घेऊन आले होते.
केळी बाजारासमोरील पार्किंगमध्ये ट्रक पार्क करुन थांबले होते. परिहारने रोमण यांना चाकूचा धाक दाखवला.
रोमण यांच्या खिशातील मोबाइल आणि रोकड असा 20 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला.
तसेच पोलिसांकडे तक्रार दिल्यास तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन तो पसार झाला.
याबाबत रोमण यांनी पोलिसांना कडे फिर्याद दिली. पोलिसांनी परिहारला ताब्यात घेतले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे तपास करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PSI Suspended In Pune Pimpri | पुणे (पिंपरी) : पाच लाख खंडणी प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित

Manoj Jarange Patil On Maratha Reservation | ‘सगेसोयरे’चा मुद्दा निकाली काढायचा नव्हता, तर अधिवेशनाची गरजच काय? मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जरांगे संतापले

Maratha Reservation | मराठा आरक्षणावर आज महत्वाचा निर्णय, विशेष अधिवेशनात विधेयक मांडणार

ACB Trap Case | सहायक फौजदार लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Asim Sarode On Eknath Shinde | एकनाथ शिंदे औट घटकेचे राजे, उद्धव ठाकरेंना पक्षाचे नाव आणि चिन्ह परत मिळेल : असिम सरोदे

पुणे : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला उंदीर मारण्याचे औषध पाजले, पतीला अटक