Pune Marketyard Mango News | पुणे : देवगड, रत्नागिरी हापूस च्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक, मार्केट यार्डात विकला जातोय कर्नाटकातील आंबा

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – Pune Marketyard Mango News | फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्यांचा हंगाम सुरू होताच गुलटेकडी मार्केट यार्डात रत्नागिरी आणि देवगड आंब्याच्या नावाखाली कर्नाटकातून येणाऱ्या आंब्याची विक्री केली जात आहे. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या आडत्यांवर कारवाई करण्याचे आदेश धाब्यावर बसवून फसवणुकीचा गोरखधंदा तेजीत असल्याचे समोर आले आहे. मात्र, बाजार समिती प्रशासनाकडून आडत्यांना पाठिशी घालून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.

आंब्यांचा हंगाम सुरु होताच बाजारात कोकणातील देवगड, हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात होते. आंब्याच हंगाम सुरु झाल्याने पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केटयार्ड फळबाजारात मोठ्या प्रमाणात कोकणासह कर्नाटकातून आंबे येत आहेत. याचाच गैरफायदा आडतदार घेत आहेत. ग्राहकांना कोकणातील देवगड, हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकातून येणाऱ्या आंब्याची विक्री करुन फसवणूक करत आहेत.

नागरिकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी तत्कालीन पणन संचालकांनी परिपत्रक काढत अशा फसवणूक करणार्‍या आडत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश राज्यातील सर्व बाजार समित्यांना दिले. हे आदेश देऊन सुमारे चार वर्षे होत आले. मात्र, मार्केटयार्डमध्ये सर्रास कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेशातील आंब्यांची देवगड, रत्नागिरी हापूसच्या बॉक्समध्ये भरून विक्री केली जात आहे.

विभाग प्रमुख, गटप्रमुखांचा कानाडोळा

मार्केट यार्डात आंब्याच्या हंगामात प्रत्यक्ष झालेली आवक आणि कागदावर आवक यात मोठी तफावत असते.
ग्राहकांची फसवणूक करणारे बहुतांश आडतदार हे परराज्यातील आंबा विक्री करतात.
मात्र, आंबा हंगामात आडते आणि विभागप्रमुख, गटप्रमुखांच्या साटेलोट्यामुळे कारवाई केली जात नाही.
परिणामी नागरिकांची फसवणूक होते.

आडत्यांवर निलंबनाची कारवाई करणार

बाजार समितीचे सचिव डॉ.राजाराम धोंडकर म्हणाले, हापूसच्या नावाखाली इतर आंबा विक्री करून फसवणूक
करणार्‍या आडत्यांवर पहिल्या टप्प्यात दंडात्मक आणि परवाना निलंबनाच्या कारवाई केली जाईल.
त्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha Election 2024 | पुणे : ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : धक्कादायक! सामोस्या मध्ये टाकले निरोध, दगड अन् गुटखा, खाद्य पदार्थ पुरवणाऱ्या कंपनी मालकासह 5 जणांवर FIR

PM Narendra Modi | आज सायंकाळी PM मोदींची चंद्रपूरमध्ये सभा, आगमनापूर्वी म्हणाले महाराष्ट्रातील जनमानसाने महाप्रण केलाय…