गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डीजे लावू न दिल्याने पोलीसाचे फोडले डोके : पोलीस रक्तबंबाळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

न्यायालयाने डिजेला परवानगी नाकारल्यानंतरही गणपती विसर्जन मिरवणूकीसाठी डिजेला एनओसीची मागणी खडकीतील एका गणेश मंडळाने केली. मात्र, पोलीस हवालदारांनी एनओसी न दिल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस हवालदाराच्या डोक्यात जड वस्तूने मारहाण केली. यामध्ये पोलीस हवालदाराच्या डोक्यावर जखम झाली आहे. ही घटना आज (रविवार) रात्री आठच्या सुमारास घडली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8d417e18-bf48-11e8-a69f-e51959569dcc’]

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार थिटे यांना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या डोक्यात जड वस्तूने वार केले. हाय कोर्टाने डिजेला परवानगी नाकारल्यामुळे पुण्यातील १२५ मंडळांनी नाराजी व्यक्त करत गणपती विसर्जन मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, हा वाद सुरु असतानाच खडकीतील एका गणेश मंडळाने गणपती विसर्जन मिरवणूकीदरम्यान डिजे वाजवण्यासाठी खडकी पोलीस ठाण्यात परवानगी मागितली. परंतु डिजे वाजवण्यासाठी नसल्याने गणेश मंडळाला परवानगी देण्यास खडकी पोलिसांनी नकार दिला. याच कारणावर मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांची आणि पोलीस हवालदार थिटे यांच्यात बाचाबाची झाली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हवालदार थिटे यांना मारहाण करुन त्यांच्या डोक्यात जड वस्तूने वार केले. यामध्ये थिटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी गणेश मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिसांकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पुढील तपास खडकी पोलीस करीत आहेत.
[amazon_link asins=’B07FW8KSFP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’941b568c-bf48-11e8-94e0-5de78632d9a3′]

खडकी कॅन्टोमेंटच्या उपाध्यक्षावर बुक्का उधळला
आज सर्वत्र गणेश विसर्जन सोहळा उत्साहात सुरु असताना खडकीमध्ये मात्र याला थोडे वेगळे वळन लागले. खडकी कॅन्टोमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष चास्कर आणि सुरेश कांबळे यांच्यावर काळा बुक्का उधळण्यात आला. स्टेजवर बुक्का उधळल्याने झालेल्या धवपळीत स्टेज कोसळला. या घटनेत उपाध्यक्ष जखमी झाले आहेत.

पुण्यामध्येही काही मंडळांनी डिजे लावून निषेध व्यक्त केला. तसेच अनेक मंडळांनी गणपती विसर्जन मिरवणूकीत डिजे वाजवत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. ज्या मंडळांनी आज डिजे लावून गणेश विसर्जन मिरवणूक काढील त्या मंडळांवर सध्यातरी कोणतीही कारवाई पोलिसांकडून करण्यात आली नाही. मात्र, ज्या मंडळांनी डिजे लावून गणपती विसर्जन मिरवणूक काढली आहे अशा मंडळांवर सोमवारी कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

पुणे (बाजीराव रोड)| DJ समोर टाळ वाजवून गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला DJ बंदीचा निषेध