व्यापाऱ्यांच्या देशव्यापी बंदला पूना मर्चंट्स चेंबर्स चा पाठिंबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

परदेशी गुंतवणुकीच्या विरोधात व्यापाऱ्यांचा देशव्यापी लाक्षणिक बंद दिनांक २८ सप्टेंबर रोजी होणार असून दि पूना मर्चंट्स चेंबर्सने त्यास पाठिंबा जाहीर केला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b44c900d-bda5-11e8-a8df-4b0c208f1c3b’]
वॉलमार्ट-फ्लिपकार्ट या सारख्या कंपन्यांना केंद्र सरकारने रीटेल क्षेत्रात १०० टक्के गुंतवणूक करून व्यापार करण्यास परवानगी दिली आहे. या कंपन्यांची व्यापार विषयक ताकद मोठी आहे. परदेशी कंपन्यांना परदेशातून वार्षिक दोन टक्के दराने कर्ज पुरवठा होतो. तर, भारतात दहा ते बारा टक्के दराने वार्षिक कर्ज पुरवठा होतो. वॉलमार्ट पाठोपाठ इ-कॉमर्स मधील अमेझॉनने नुकतेच आदित्य बिर्ला समुहाचे मोअर सुपर मार्केट खरेदी करून किराणा व्यवसायात पाऊल टाकले आहे. नुकसान सहन करून बाजारावर नियंत्रण मिळविण्याचा या कंपन्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्यासमोर छोटे आणि मध्यमवर्गीय व्यापारी तग धरू शकणार नाहीत. छोट्या व्यापाऱ्यांना हळूहळू आपले व्यवसाय बंद करावे लागतील. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेले कर्मचारी, कामगार, छोटे वाहतूकदार आणि उत्पादक बेरोजगार होतील. परदेशी कंपन्यांची मक्तेदारी होईल आणि ग्राहकांना त्याप्रमाणे खरेदी, विक्री करावी लागेल. असमतोल साधणाऱ्या केंद्र सरकारच्या या निर्णयाला पूना चेंबर्सचा नेहमीच विरोध राहिला आहे असे चेंबर्सचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले.