महामेट्रो पुणेच्या फेसबुक पेजला ४ लाख १६ हजार लाईक्स

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दिड वर्षापूर्वी पुणे मेट्रोचे काम सुरु झाले त्यावेळेस सुरु केलेले फेसबुक पेज आज ४ लाख नागरिकांच्या पसंतीस उतरले आहे. संपूर्ण शहरात सुरु असणाऱ्या मेट्रो बांधकामाची अद्ययावत माहितीतपासणे आणि मनात येणाऱ्या शंकांचे निरसन करून घेणे त्यांच्या रोजच्या जगण्याचा एक भाग झाला आहे. प्रत्येक प्रश्नांची उत्तरं इथे मिळत असल्याने झपाट्याने चाहता वर्ग वाढला आहे.

चार वर्ष सत्तेत आहात मग राममंदीर का नाही झाले – राष्ट्रवादी नेते


देशातील तिसऱ्या क्रमांकाचे फेसबुक पेज –

संपूर्ण देशात इतर मेट्रो फेसबुक पेजमध्ये नागपूर मेट्रो ४.५६ लाख, कोची मेट्रो४.३९  लाख एवढे लाईक्स असलेले पहिल्या आणि दुसऱ्या नंबर नंतर तर पुणे मेट्रो त्या नंतरचे ४.१६ लाख तिसऱ्या क्रमांकाचे फेसबुक पेज ठरले आहे. तसेच महाराष्ट्रातले आणि पुणे शहरातील इतर नामवंतफेसबुक पेजमध्येही पुणे मेट्रो पेज हे प्रथम क्रमांकाचे लोकप्रिय पेज म्हणून नावारूपास आले आहे.

रेल्वे दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी होणार – मुख्यमंत्री अमरिंदर सिंग


'मेट्रो संवाद &#39 कार्यक्रम –

पुणे मेट्रोचे फेसबुक पेज हे निव्वळ नागरिकांना आकर्षित करण्यासाठी म्हणून नसून इथे नियमित त्यांच्याप्रश्नांची उत्तरे दिली जाते. एका आठवड्याला १.२० लाखावर नागरिक फेसबुक पेजला भेट देतात तसेच २० हजार नागरिक आठवडाभरात पोस्टला प्रतिसाद देतात. आजपर्यंत सुरु असलेल्या बांधकामाव्यतिरिक्त भविष्यात मेट्रोमुळे होणारे लाभ, शहराचा विकास, तांत्रिक बाबी, रोजगार अश्या सर्वव्यापी प्रश्नांना नागरिकांनी विचारलेल्या भाषेत तसेच त्यांना समजेल अशा स्वरूपात सविस्तर उत्तरंदेऊन त्यांचे समाधान केले जाते. या प्रश्नातून निर्माण होणाऱ्या शंका परस्पर जाऊन सोडवण्यासाठी दरमहिन्याला नागरिकांच्या समस्त 'मेट्रो संवाद ' कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

या कार्यक्रमात त्या-त्याविभागातील वरिष्ठ प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांशी हितगूज साधतात. निव्वळ तांत्रिक पोस्टच नाहीतर वृक्षारोपण, वृक्षपुनर्रोपण , वाहन सुरक्षा अभियान रक्तदान शिबीर, सेल्फीस्पर्धा विद्यार्थ्यांसाठीमनोरंजनात्मक शैक्षणिक इव्हेंट अश्या समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन तसेच सहयोग केंद्र आणिमाहिती केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना माहिती पुरवणे आणि कंट्रोल रूमच्या माध्यमातून येणाऱ्यासमस्येवर त्वरित तोडगा काढणे अशा अनेक माध्यमातून  नागरिकांशी सलोख्याचे ऋणानुबंध जोडूनघेण्याचा प्रयत्न पुणे मेट्रो चमू सदैव करीत असते. नागरिकांच्या फायद्याचे असणारे काही माहितीपूर्ण कार्यक्रम 'फेसबुक लाईव्ह' स्वरूपात तर व्यवस्थापकीयसंचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांचा नागरिकांसाठी असलेल्या सूचना अनेकदा व्हिडीओ रूपातनागरिकांपर्यंत पोहचवले जातात.

पंतप्रधान खोटं बोलले : साईभक्त अशोक चव्हाण यांचा हल्लाबोल

पुणे परंपरेतले गणपती महोत्सव,दिवाळी पहाट मोठ्या उत्साहात साजराकरण्यात आला. याशिवाय बांधकाम स्थळावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या कॅमेराने टिपलेलेछायाचित्र प्रकाशित करणे किंवा विविध कॉन्टेस्टच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना जुळवून ठेवण्याचेकाम हे फेसबुक पेज करते आहे. याकाळात फेसबुकवर प्रकाशित होणाऱ्या माहितीच्या आधारे महामेट्रोच्यापारदर्शी कामाची प्रचिती आल्याने नागरिकांचा विश्वास प्रगाढ होत जाऊन मेट्रो चमूसोबत सामाजिक कार्यकरण्याची नागरिकांची रुची वाढत जाते आहे याच माध्यमातून जवळ जवळ १३०० मेट्रोमित्र यापरिवारात सामील झाले आहेत.

आज अजून मेट्रो रुळावरून धावायची असूनही नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि सहकार्य या ४ लाखाच्या  आकड्यावरून लक्षात घेता, पुढील कार्यप्रवास अधिक वेगाने आणि त्यांच्या विश्वासावर खराउतरणारा होणार यात शंका नाही. याच आनंदी उत्साही घटनेचे साक्षीदार होता यावे म्हणून आज दि. २०ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता घोले रोड येथील मेट्रो कार्यालयात डॉ. ब्रिजेश दीक्षित आणि चमूनेउत्साहात साजरा केला. याप्रसंगी डॉ.ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो यांनी या यशाचेश्रेय पुण्याचे नागरिकांना दिले. यावेळी कार्यकारी संचालक(एसपी) श्री. रामनाथ सुब्रमण्यम, प्रकल्प संचालक श्री. हुकुम सिंह चौधरी, श्री. डॉ . हेमंत सोनावणे जनसंपर्क महाव्यवस्थापक उपस्थित होते.