Pune Metro News | हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी केंद्र शासनाकडून 410 कोटी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत Pune Metropolitan Region Development Authority (पीएमआरडीए – PMRDA) राबविण्यात येत असलेल्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर (Man-Hinjawadi to Shivajinagar) या पुणे मेट्रो (Pune Metro News) लाईन -3 प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून (Central Govt) 410 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो (Pune Metro News) प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर अंमलबजावणी करण्यास राज्य शासनाने 9 फेब्रुवारी 2018 रोजी शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे.

या प्रकल्पाची अंमलबजावणी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लि. (Pune IT City Metro Rail Ltd.) या सवलतकार कंपनीमार्फत करण्यात येत आहे. प्रकल्पाचा सवलत करारनामा २१ सप्टेंबर २०१९ रोजी स्वाक्षांकित करण्यात आला आहे. तसेच, २५ नोव्हेंबर २०२१ ही नियुक्ती तारीख (Appointed Date) देण्यात आली असून प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर आहेत.

हा मेट्रो (Pune Metro News) प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर राबविण्यात येत आहे.
या प्रकल्पासाठी केंद्र शासनामार्फत १ हजार २२५ कोटी इतका व्यवहार्यता तफावत निधी अपेक्षित आहे.
प्रकल्पाचे सवलतकार पुणे आयटी सीटी मेट्रो रेल लिमिटेड यांनी १०० टक्के इक्विटीची (Equity) गुंतवणूक केली आहे. त्या प्रमाणात बँकेद्वारे कर्ज पुरवठा करण्यात आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडून १ हजार २२५ कोटी पैकी ४१० कोटी मिळणेबाबतचा प्रस्ताव प्राधिकरणामार्फत केंद्र शासनाच्या आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालयाकडे सादर करण्यात आला होता. प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल, मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी पाठपुरावा केल्यामुळे हा निधी मिळाला.

माण हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईनसाठी ४१० कोटी रुपये केंद्र शासनाकडून प्राप्त झाले आहे.
हा निधी प्राप्त झाल्यामुळे प्रकल्पाची गती वाढून प्रकल्पाचे काम लवकर पुर्ण होण्यास निश्चितच मदत होईल असे
महानगर आयुक्त, पीएमआरडीए राहुल महिवाल यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Atul Bedekar Passed Away | व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन

Pune Crime News | पुणे विद्यापिठातील वसतिगृहाच्या भिंतीवर मोदींबाबत आक्षेपार्ह मजकूर, विद्यापीठाकडून पोलिसांकडे तक्रार

Pune Crime News | एक कोटीचे दागिने घेऊन सोन्याच्या दुकानातील कर्मचारी पसार, पुण्यातील घटना

Crime News | खोट्या सह्या करुन बँक खात्यातून पैसे काढून महिलेची फसवणूक, कोथरुड मधील प्रकार

Indrani Balan Foundation | ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ काश्मीरमधील आणखी शाळा दत्तक घेणार – पुनीत बालन