Pune Crime News | पुणे विद्यापिठातील वसतिगृहाच्या भिंतीवर मोदींबाबत आक्षेपार्ह मजकूर, विद्यापीठाकडून पोलिसांकडे तक्रार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) वसतीगृहांच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) संदर्भात आक्षेपार्ह मजकूर (Offensive Content) लिहण्यात आला आहे. विद्यापीठाकडून या सर्व प्रकाराविरोधात पोलिसांत (Pune Police) तक्रार देण्यात आली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.2) रात्री साडे आठ वाजता उघडकीस आला आहे. (Pune Crime News)

याबाबत विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. महेश रघुनाथ दवंगे (वय-37 रा. काटे वस्ती, पिंपळे सौदागर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात आयपीसी 294, 500 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मुलांचे वसतीगृह आहे. वस्तीगृह क्रमांक 8 येथील कपडे धुण्याच्या ठिकाणी असलेल्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात अक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचे विद्यापीठ प्रशासाच्या निदर्शनास आले. हा मजकूर काळ्या रंगाच्या पेंटने इंग्रजी मध्ये लिहिण्यात आला आहे. आरोपीने सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकाचे कृत्य करुन विद्यापीठाची बदनामी केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. (Pune Crime News)

दरम्यान, हा प्रकार विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत विद्यापीठ प्रशासन व पोलीस
यांना माहिती दिली. त्यानंतर विद्यापीठाकडून तक्रार देण्यात आली. हे कोणी लिहिले, कधी लिहिले याचा तपास
पोलीस करीत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील (API Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil-Maratha Reservation | वेळ घ्या पण आरक्षण द्या, सरसकट आरक्षणासाठी 2 जानेवारीपर्यंत वेळ; जरांगे पाटलांनी उपोषण सोडले

Pune Drug Case | ड्रग्स माफिया ललित पाटील, अरविंदकुमार लोहरे यांच्यासह 14 जणांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 76 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

Pune Crime News | एक कोटीचे दागिने घेऊन सोन्याच्या दुकानातील कर्मचारी पसार, पुण्यातील घटना

Pune ISIS Module Case | ‘पुणे आयएसआयएस मोडयूल केस’मध्ये ‘एनआयए’ने आणखी एका दहशतवाद्याला केली अटक