Pune Metro News | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! मेट्रो एप्रिलपासून गरवारे ते रुबी हॉल धावणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणेकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो (Pune Metro News) मार्गिका येणार आहे. गरवारे महाविद्यालय स्थानक (Garware College Station) ते रूबी हॉल क्लिनिक स्थानक (Ruby Hall Clinic Station) या दरम्यानच्या मेट्रो मार्गिकेचे (Pune Metro News) काम अंतिम टप्प्यात आले असून मार्गिकेची कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच या मार्गिकेवर एप्रिल महिन्यात मेट्रो धावणार आहे.
गरवारे स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानकादरम्यान मेट्रोच्या मार्गिकेचे (Pune Metro News) काम जवळपास पूर्ण झाले आहे. मार्च अखेर हे काम पूर्ण होईल. त्यानंतर केंद्रीय समितीच्या (Central Committee) पाहणी दौऱ्यानंतर या मार्गावर प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. गरवारे महाविद्यालय स्थानक ते रूबी हॉल क्लिनीक स्थानक या दरम्यान डेक्कन (Deccan), छत्रपती संभाजी महाराज उद्यान (Chhatrapat Pune Municipality i Sambhaji Maharaj Park), पुणे महापालिका (Pune Municipality), शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय (Shivajinagar District Sessions Court), आरटीओ (Pune RTO), पुणे रेल्वे स्थानक (Pune Railway Station) ही स्थानके आहेत.
गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल क्लिनीक स्थानकादरम्यान डेक्कन आणि छत्रपती संभाजी महाराज उद्यान स्थानकाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. या दोन्ही स्थानकांची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. या स्थानकांची रचना छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या मावळ्याच्या पगडीच्या आकाराप्रमाणे करण्यात आली आहे. या स्थानकांचे काम पूर्ण झाल्यानंतर एप्रिलमध्ये पुणे मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
ही दोन्ही स्थानके नदीपात्रात असून स्थानकांची उंची जमिनिपसुन 60 ते 70 फूट एवढी आहे.
एप्रिलमध्ये ही दोन्ही स्थानके पुणेकरांसाठी खुली होणार असल्याने नामदार गोपाळकृष्ण
गोखले रस्ता (FS Road), जंगली महाराज रस्ता (JM Road), बालगंधर्व रंगमंदिर,
पुणे महापालिका, आरटीओ, वाडिया महाविद्यालय आदी महत्त्वाची ठिकाणे मेट्रोद्वारे जोडली जाणार आहेत.
Web Title : Pune Metro News | pune-metro-to-run-from-garware-college-to
ruby-hall-clinic-metro-from-april
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा