Old Pension Scheme News | ‘कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर सुविधांचे तत्व आम्ही मान्य केले, मात्र…’, देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं (व्हिडिओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्या पेन्शनच्या (Old Pension Scheme News) मागणीसाठी सुरु असलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला आहे. राज्य शासनासोबतच्या यशस्वी चर्चेनंतर संप मागे घेत असल्याची घोषणा समितीचे संयोजक विश्वास काटकर (Vishwas Katkar) यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची महत्त्वाची बैठक सोमवारी विधान भवनात पार पडली. जुनी पेन्शन (Old Pension Scheme News) लागू करण्याच्या मागणीवरुन सरकारी कर्मचारी गेले सात दिवस संपावर (Government Govt Employees Strike) होते. या संपात 18 लाख कर्मचारी सहभागी झाले होते. संप मिटल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस सध्या येथे जी-20 परिषदेसाठी नागपूर (G-20 Conference Nagpur) येथे आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, कर्मचाऱ्यांचा संप (Old Pension Scheme News) मिटल्याची माहिती मला मिळाली, ही आनंदाची बातमी आहे. कुठलाही अहंकार न ठेवता कर्मचाऱ्यांना जी सामाजिक सुरक्षा हवी आहे. निवृत्तीनंतर ज्या सुविधा हव्या आहेत. त्याचे तत्व आम्ही मान्य केले मात्र त्याचे वर्किंग कसे करावे, याबाबत समिती काम करत आहेत. समितीचा अहवाल तीन महिन्यात येईल. सरकारने आडमूठी भूमिका न घेतल्याने कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, सर्व कर्मचारी आमचे आहेत. त्यामुळे सरकारच्या वतीने त्यांना जे चांगले देता येईल
ते देण्याची आमची जबाबदारी आहे. त्यात कुठेही आमची आडमुठी भूमिका नाही.
समितीच्या अहवालावर आपल्याला पुढची कारवाई करता येईल. समितीला तीन महिन्याचा वेळ दिलेला आहे
असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच यापुढेही कर्मचाऱ्यांसोबत जास्तीत जास्त चर्चा करुन मार्ग काढू असे
फडणवीस यांनी सांगितले.

Web Title :  Old Pension Scheme News | devendra-fadnavis-first-reaction-after-government-employees-called-off-their-strike

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dr. Mhaske Hospital & Research Center – Hadapsar, Pune | डॉ. म्हस्के हॉस्पिटलमध्ये एकाच छताखाली अत्याधुनिक सुविधा ! हडपसरमध्ये इंटीग्रेटेड सर्जिकल केअर सेंटरचे उद्घाटन

Pune News | पुण्यात माणुसकीचे दर्शन ! 32 वर्षानंतर घडवून आणली आई आणि मुलांची भेट

Former MP Amar Sable | अंधाऱ्या काळोखात पांढऱ्या प्रकाशाची रेघ ओढावी, त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या जीवनात महाडचा सत्याग्रह करून प्रकाशाची वात पेटवली – माजी खासदार अमर साबळे