
Pune Metro | पुणे मेट्रोला पावला गणपती बाप्पा! उत्सवात कोट्यवधीची कमाई, 9 लाख पुणेकरांनी केला प्रवास, अनंत चतुर्दशीला विक्रम
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Metro | यंदाच्या गणेशोत्सवात (Pune Ganesh Festival 2023) पुणेकरांनी प्रवासासाठी मेट्रोचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने मेट्रोच्या तिजोरीत कोट्यवधीची भर पडली आहे. १० दिवसांच्या उत्सावात ९ लाख ६१ हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. यातून मेट्रोला १ कोटी ४० लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले. अनंत चतुर्दशीला म्हणजेच विसर्जनाच्या दिवशी तर मेट्रोतून १ लाख ६३ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही विक्रमी संख्या आहे. (Pune Metro)
मेट्रोने गणेशोत्सवात रात्री १२ पर्यंत सेवा दिली. १० दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी मेट्रोने पहाटे २ पर्यंत आपली सेवा सुरू ठेवली. संपूर्ण गणेशोत्सवात दोन्ही मार्गावर मेट्रोला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद लाभला. अनंत चतुर्दशी आणि त्याच्या आदल्या दिवशी मेट्रोचा तब्बल ३ लाख प्रवाशांनी लाभ घेतला. विसर्जनाच्या दिवशी मेट्रो गाड्या भरभरून जात होत्या. (Pune Metro)
विसर्जनाच्या दिवशी सकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी पहाटे २ पर्यंत मेट्रो सेवा उपलब्ध असल्याने १ लाख ६३ हजार
प्रवाशांनी प्रवास केला. यातून मेट्रोला २५ लाख ५८ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले.
विसर्जनाच्या आदल्या दिवशी १ लाख ३५ हजार प्रवाशांनी मेट्रो प्रवासाचा लाभ घेतला होता. विसर्जनाच्या दिवशी तर प्रवाशी संख्येने विक्रम केला.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every updateहे देखील वाचा
Sujata Phadnis Passes Away | दैनिक सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांना मातृशोक, सुजाता फडणीस यांचे निधन