Deepak Kesarkar On BJP | शिंदे गटातील मंत्र्याचे मोठे विधान, म्हणाले – ‘…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता’

सिंधुदुर्ग : Deepak Kesarkar On BJP | शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी सत्ता आणि मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेब ठाकरेंची तत्वे बाजूला ठेवली. महाविकास आघाडीच्या काळात सुरू असलेले काम कोणालाही पसंत नव्हते. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांसाठी शिवसेनेत गेलो. नाहीतर भाजपात प्रवेश केला असता. (Deepak Kesarkar On BJP)

दीपक केसरकर सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, उद्धव ठाकरे स्वत: न्यायाधीश आहेत. स्वत: बोलतात, कारण त्यांचे विश्वच वेगळे आहे. ते कल्पनेच्या विश्वात वावरतात. त्यामुळे पक्षातील असंतोष त्यांना समजला नाही. बाळासाहेबांनी मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी पक्ष स्थापन केला. शेवटपर्यंत तत्व जपली. (Deepak Kesarkar On BJP)

केसरकर म्हणाले, सनातन धर्म आणि वीर सावरकरांना शिव्या घातल्यावर ठाकरे गट एक शब्दही बोलला नाही.
कारण, मिळणारी पदं आणि ताकद कमी होईल. बाळासाहेबांनी असे कधीही केले नाही.
युतीच्या विरोधात मतदान करायला सांगणारे बाळासाहेब ठाकरे होते. याला बाळासाहेबांचे विचार म्हणतात.
म्हणून आम्ही बाळासाहेबांच्या विचारांबरोबर राहिलो.

केसरकर म्हणाले, आम्हाला स्वत:ची आमदारकी वाचवायची असती, तर दुसऱ्या पक्षात गेलो असतो. पक्षांतरला कुठलीच बंदी नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Ganeshotsav 2023 | ‘आता तुम्ही कोयता घेऊनच दाखवाच…’, गणपती विसर्जन मिरवणुकीत साकारला देखावा

Pune Crime News | सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉजजवळ लाईन बॉय विजय ढुमेचा कोयत्याने सपासप वार करून खून, प्रचंड खळबळ