Pune Metro | विनाचालक धावणार पुणे मेट्रो; काम अंतिम टप्प्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आले आहे लवकर पुणेकरांच्या सेवेस मेट्रो (Pune Metro) दाखल होणार आहे. पुणे मेट्रो ही स्वयंचलित असून सुरुवातीला प्रवासी वर्गाला भीती वाटू नये म्हणून चालकासह मेट्रो (Pune Metro) धावणार आहे. त्यानंतर प्रवाशांना सवय झाल्यानंतर ती विनाचालक धावणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विनाचालक मेट्रो वनाज ते रामवाडी (vanaz to ramwadi metro) व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट (pimpri chinchwad to swargate metro route) दरम्यान धावणार आहे. शिवाजीनगर (Shivajinagar) येथील धान्य गोडाऊन येथे असलेल्या मेट्रोच्या टर्मिनलमध्ये या मार्गाचे नियंत्रण असणार आहे. मेट्रोच्या आत आणि स्थानकातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण कक्ष शिवाजीनगरला असणार आहे. त्यामुळे येथून मेट्रोवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. मेट्रो मार्ग तयार झाल्यानंतर अवघ्या ६० सेकंदात मेट्रोची सेवा उपलब्ध होणार आहे. लक्ष्मी रस्त्यावर (Laxmi Road) खरेदी, बालगंधर्वला नाटक, आयनॉक्स किंवा ई-स्क्वेअरला सिनेमा असो की दगडूशेठ गणपतीचे दर्शन मेट्रोच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पुणेकरांना या ठिकाणी आल्यानंतर वाहनतळ शोधण्याची गरज भासणार नाही. वातानुकूलित मेट्रोचा (Pune Metro) प्रवास करत इच्छित स्थळी पोहोचता येणार आहे.

Maharashtra Band | पुण्यात शासकीय यंत्रणेचा गैरवापरकरून बंद करण्याचा प्रयत्न – भाजप शहराध्यक्ष मुळीक (व्हिडिओ)

फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या एका सभागृहात २८ डिसेंबर १८९५ला ल्युमियर बंधूनी ‘द अरायव्हल ऑफ द ट्रेन’ हा चित्रपट दाखविला होता.
प्लॅटफॉर्मवर रेल्वे येत असल्याचे चित्रपटात दाखवण्यात आले होते.
हे पाहताच त्यावेळी प्रेक्षकांनी सभागृहातून धूम ठोकली होती.
कारण यापूर्वी प्रेक्षकांनी रेल्वे कधीच पहिली नव्हती. त्यामुळे त्यांची तारांबळ उडाली. मात्र, ल्युमियर बंधूनी हाच चित्रपट पुन्हा ७ जुलै १८९६ मध्ये मुंबई येथील वॅटसन हॉटेलमध्ये दाखविला; पण गंमत म्हणजे प्रेक्षकांनी काहीच हालचाल केली नव्हती.
कारण ४३ वर्षांपूर्वी १६ एप्रिल १८५३ मध्ये बोरीबंदर ते ठाणे दरम्यान रेल्वे धावलेली पाहिली होती.
त्यामुळे चित्रपटातील रेल्वे पाहून कोणालाही आश्चर्य वाटले नाही.
काही देशांच्या अगोदर ब्रिटिशांनी भारतात रेल्वे सुरु केली असली तरी मेट्रो धावण्यासाठी ५० ते ६० वर्षे वाट पाहावी लागली आहे.

हे देखील वाचा

Anil Deshmukh | CBI चं पथक अनिल देशमुखांच्या घरी दाखल, मुलगा सलील देशमुखला अटक होण्याची शक्यता

Petrol Diesel Price Pune | डिझेलच्या दराची शतकाकडे वाटचाल ! सलग सहाव्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात भाववाढ; जाणून घ्या आजचे दर

 

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Metro | Pune Metro to run without driver but to run control will be done from shivajinagar grain godown

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update