Pune Metro | पुणे मेट्रो व महामेट्रोची दोन स्थानके एकमेकांना जोडणार, 150 मीटरच्या पादचारी पूलाचा आराखडा तयार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे मेट्रे (Pune Metro) सुरु झाल्याने अनेक प्रवासी मेट्रोने प्रवास करत आहेत. पुणे मेट्रो (Pune Metro) आणि महामेट्रोच्या (Mahametro) प्रवाशांना दोन स्थानकांमध्ये ये-जा करता यावी यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पुणेरी मेट्रो आणि शिवाजीनगर मेट्रो स्थानके (Shivajinagar Metro Station) जिल्हा न्यायालय परिसरात आहेत. या दोन्ही स्थानकांना पादचारी पुलाने जोडण्यात येणार आहे. हा पादचारी पूल 150 मीटरचा असणार आहे. या पुलामुळे प्रवाशांना दोन्ही स्थानकांमध्ये ये-जा करणे सोपे जाणार आहे.

पीएमआरडीए (PMRDA) अर्थात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
(Pune Metropolitan Region Development Authority) यांच्याकडून पुणेरी मेट्रो आणि हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गाचे काम सुरु आहे. याचवेळी महामेट्रोचा पिंपरी-चिंचवड ते जिल्हा न्यायालय या मार्गाचे काम सुरु आहे. याच मार्गावर शिवाजीनगर येथे इंटरसेक्शन स्थानक आहे.
या स्थानकामध्ये दोन्ही मेट्रोंना आतमध्ये प्रवेश अथवा बाहेर पडता येणार आहे.
सध्या महामेट्रोचे स्थानक जिल्हा न्यायालय परिसरात आहे. याचवेळी पीएमआरडीएकडून या परिसरात स्थानकाची उभारणी केली जात आहे.

पुणेरी मेट्रो आणि महामेट्रोच्या प्रवाशांना दोन्ही स्थानकांवर ये-जा करताना सोपे जावे यासाठी हा पादचारी पूल बांधण्यात
येणार आहे. या पुलामुळे दोन्ही स्थानके एकमेकांना जोडली जाणार आहेत.
पुलाचा आराखडा तयार असून पुणेरी मेट्रोच्या जिल्हा न्यायालय परिसरातील स्थानकाचे काम पूर्ण होत आल्यानंतर
या पुलाचे काम सुरु केले जाणार आहे, अशी माहिती महमेट्रोचे संचालक (कार्य) अतुल गाडगीळ यांनी दिली.

महामेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशाने परतीचे तिकीट काढले असेल तर त्याची वैधता दिवसभर आहे.
हा नियम सुरुवातीपासून आहे. सेवा सुरु असलेल्या कालावधीत दिवसभरात प्रवाशांना परतीच्या तिकीटावर प्रवास करता येतो,
अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Crisis | निवडणूक आयोगाने एकांगी निर्णय घेतला, शरद पवार गटाचा आरोप; पुढील सुनावणी ‘या’ तारखेला

Pune Crime News | ससूनमधील वॉर्ड नंबर 16 म्हणजे श्रीमंत गुन्हेगारांचे दुसरे घर, अनिल भोसले, रुपेश मारणेसह अनेक अट्टल गुन्हेगारांचा ससूनमध्ये मुक्काम