Pune Metro Station | मेट्रो स्टेशन परिसरात फिडर बससेवा अधिक मजबूत करणार

मेट्रोच्या तिकीटातच बसचे तिकीट देण्यावर विचार सुरू – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Metro Station | मेट्रो प्रवाशांच्या सुविधेसाठी पीएमपीएमएलच्या (PMPML) माध्यमातून प्रत्येक मेट्रो स्टेशन परिसरात फिडर बस (Metro Feeder Bus service) व्यवस्था वाढविण्यासाठी छोट्या आकाराच्या ३०० ई बसेस घेण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात येणार आहे. तसेच मेट्रो आणि या बससेवेच्या प्रवासासाठी एकाच तिकीटात आकारणी करण्याबाबतची चर्चाही मेट्रो प्रशासनासोबत सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली. (Pune Metro Station)

मेट्रोच्या पिंपरी ते शिवाजीनगर येथील सिव्हील कोर्ट तसेच गरवारे कॉलेज ते रुबी हॉल हा मार्ग सुरू झाल्यानंतर मागील १५ दिवसांत मेट्रोने प्रवास करणार्‍यांची संख्या वाढली आहे. दररोज ३५ हजार प्रवासी प्रवास करत आहेत. मेट्रोचा वापर वाढला असला तरी पीएमपीएमएलची प्रवासी संख्या कमी झालेली नाही. याचाच अर्थ या मार्गावर खाजगी वाहनांने प्रवास करणार्‍यांची संख्या कमी झाली आहे, असेही प्रथमदर्शनी दिसून येत आहे. रुबी हॉल ते रामवाडी दरम्यानची मार्गीका येत्या नोव्हेंबरपर्यंत पुर्ण होईल. मात्र सिव्हील कोर्ट ते स्वारगेटपर्यंतच्या भुयारी मार्गाला काहीसा वेळ लागणार आहे, अशी माहिती विक्रम कुमार यांनी दिली. (Pune Metro Station)

विक्रम कुमार म्हणाले, की मेट्रोचे प्रवासी वाढावेत यासाठी मेट्रो स्टेशन परिसरात पीएमपीएमएलच्यावतीने फिडर सेवा देण्यात येणार आहे. यासाठी पीएमपी प्रशासन भाडेतत्वावर छोट्या आकाराच्या अर्थात ७ मी. लांबीच्या ई बसेस भाडेतत्वावर घेणार आहे. याची निविदा प्रक्रिया देखिल सुरू आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना खाजगी वाहन टाळुन अगदी घरापासूनही मेट्रो स्टेशनपर्यंत जाण्याची सुविधा निर्माण होणार आहे. या बसमध्येही मेट्रोचे तिकीट काढता येउ शकेल, तसेच मेट्रोतून उतरल्यानंतर बसने घरी जाण्यासाठी मेट्रोच्या तिकीटातच बसचे तिकीट काढण्याची सुविधा करण्याबाबत दोन्ही प्रशासनाची चर्चा सुरू आहे. यामध्ये लवकरच मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे.

मेट्रोसाठी बसची फिडर सेवा सुरू केल्यास खाजगी वाहनांची संख्या कमी होईल

मेट्रो प्रवाशांसाठी फिडर बससेवा सुरू केल्यास खाजगी वाहनांचा वापर तसेच पार्किंगवरील ताणही कमी होणार आहे.
फिडर सेवा ज्या मार्गावर होईल,
तेथील रस्त्याच्या कडेला असलेल्या पार्किंग धोरणाबाबत नागरिक आणि लोकप्रतिनिधींचा
सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास परिसरातील रस्त्यांवर वाहनांसाठी अतिरिक्त लेन उपलब्ध होउन वाहतुकीची कोंडी कमी होण्यासही मदत होणार आहे. वाहतूक पोलिस, लोकप्रतिनिधी आणि स्थानीक नागरिकांनी यासाठी एकत्रितपणे याचा विचार करण्याची गरज आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | “मी अटकेपासून वाचवले…” छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी दिले प्रतिउत्तर

Devendra Fadnavis | सत्तेमध्ये आणि विरोधामध्ये दोन्हीकडे राष्ट्रवादीच, ही खेळी शरद पवारांची; फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

Chandrapur Pune Bypoll Election | पुणे, चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुक होण्याची शक्यता कमी, सूत्रांची माहिती