Pune Metro | हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम 7 दिवसांत सुरू करावे अन्यथा आंदोलन करणार; खासदार गिरीश बापट यांचा PMRDA ला इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   Pune Metro | हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या (hinjewadi to shivajinagar metro route) कामाला मंजुरी देउन काही वर्षे झाली आहेत. परंतू अद्याप कामच सुरू न झाल्याने हा मार्ग नियोजीत वेळेत पूर्ण होणार नाही. नियोजीत वेळेत काम पूर्ण करण्यासाठी येत्या सात दिवसांत मेट्रो (Pune Metro) मार्गिकेचे काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांनी दिला आहे.

 

खासदार गिरीश बापट यांनी आज पीएमआरडीएचे सीईओ डॉ. सुहास दिवसे (Suhas K Diwase, CEO PMRDA) यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या कामाबाबत चर्चा केली.
यानंतर पत्रकारांशी बोलताना बापट यांनी वरिल इशारा दिला.
याप्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सुनिता वाडेकर, नगरसेवक प्रकाश ढोरे, आदित्य माळवे, अमोल बालवडकर,
नगरसेविका ज्योती कळमकर, नीलिमा खाडे, स्वप्नाली सायकर, कोथरूड भाजपा मंडल अध्यक्ष पुनीत जोशी उपस्थित होते.

 

बापट म्हणाले की हिंजवडी येथील आयटी पार्क (hinjewadi it park), पुणे व पिंपरी चिंचवड शहराला जोडणार्‍या हिंजवडी ते शिवाजीनगर प्रस्तावित मेट्रो
(Pune Metro) मार्गाचे काम गेले अनेक वर्षे प्रलंबित आहे. हा मार्ग नियोजित वेळेत पूर्ण होणे शक्य नाही.
आपल्याकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात आहे.
सदर मेट्रो नियोजित वेळेत पूर्ण न झाल्यास भविष्यकाळात त्यावर अतिरिक्त खर्च करावा लागेल ही शक्यता नाकारता येत नाही.
याचा नकळत आर्थिक भार हा पुणेकर जनतेला व शासनाला सोसावा लागणार आहे, ही बाब नक्कीच गंभीर आहे.
सदर मार्ग सुरु होण्यास विलंब होत असल्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचा झालेला आहे.
त्यामुळे पुणेकरांना मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे.

सदरचा मार्ग हा पुणे, पिंपरी-चिंचवड मधील नागरिक व आयटी क्षेत्रात काम करणार्‍या असंख्य कर्मचार्‍यांना वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका देणारा
असल्यामुळे सदर मार्गाचे काम ज्या ९८ % जागा ताब्यात आलेल्या आहेत.
त्या ठिकाणी तातडीने सुरू करावे, तसेच ज्या उर्वरित शासनाच्या जागा ताब्यात आलेल्या नाही.
त्या तातडीने ताब्यात घेणेबाबत प्रशासनाने लक्ष देवुन कार्यवाही करावी.
जेणे करुन सदरचा प्रस्तावित मेट्रो (Pune Metro) मार्ग नियोजित वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.
आठ दिवसात काम सुरु न झाल्यास नजीकच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला आंदोलन करावे लागेल.

 

Web Title : Pune Metro | Work on Hinjewadi to Shivajinagar Metro should start in 7 days otherwise there will be agitation; MP Girish Bapat warns PMRDA

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Smoking-Drinking Alcohol | सिगारेट-दारू प्यायल्याने कमी होतात का दु:ख-वेदना अन् तणाव, वाढते काम करण्याची क्षमता; जाणून घ्या मनोचिकित्सकाकडून

NCRB Data | धक्कादायक ! ‘एनसीआरबी’च्या अहवालातून समोर आले तथ्य, 2020 मध्ये शेतकर्‍यांपेक्षा जास्त व्यापार्‍यांनी केल्या आत्महत्या

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार