Pune MHADA | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडा तब्बल 1200 सदनिकांची सोडत काढणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune MHADA | पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे म्हाडाच्या (Pune MHADA) वतीने आता पुन्हा एकदा लवकरच जवळपास बाराशे सदनिकांसाठी सोडत काढले जाणार आहे. 1200 सोडत काढणारी घरे वीस टक्क्यांतील अर्थात खासगी आणि नामांकित बिल्डरांच्या प्रकल्पामधील असणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पुणेकरांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

 

कोरोनाच्या महामारीमध्ये समाजातील गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाच्या (Pune MHADA) वतीने नवीन विक्रम केला आहे. म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील (Nitin Mane-Patil) यांनी पुढाकार घेऊन खासगी आणि मोठ्या बांधकाम व्यावसायिकांकडून वीस टक्क्यातील फ्लॅट (Flat) उपलब्ध करुन घेतले. यामुळे पुणे शहरातील (Pune City) प्रसिद्ध आणि बड्या बिल्डरांच्या प्रकल्पातही सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील नागरीकांना घरे मिळत आहेत.

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

दरम्यान, नितीन माने यांनी पुणे म्हाडाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रारंभीपासूनच गरीब व सर्वसामान्य नागरिकांना घरे मिळवून देण्यात अग्रेसर राहिले आहेत.
यामुळे कोरोना महामारीतही 4-4 सोडत जाहीर करुन अनेक नवीन विक्रम करण्याचा प्रयत्न पुणे म्हाडाने करुन दाखविला आहे.
जिल्ह्यामध्ये शहर आणि ग्रामीण भागामधील अनेक मोठे बिल्डर म्हाडाला उभेही करत नव्हते.
मात्र नितीन माने यांनी सहकार्य साधून वेळप्रसंगी कारवाई करुन अनेक बिल्डरांकडून हे वीस टक्क्यांतील फ्लॅट उपलब्ध करुन घेतला आहे.

 

Web Title :- Pune MHADA | mhada to be set up in pune soon lucky draw 1200 houses

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Girish Mahajan on Sanjay Raut | “सोंगाड्या चित्रपट निघाला असता तर, ती भूमिका संजय राऊतांना मिळाली असती”

 

Sanjay Raut On Underworld | संजय राऊतांनी सांगितलं, हनुमान चालिसा, भोंगे प्रकरणांशी अंडरवर्ल्डचं कनेक्शन; म्हणाले…

 

Anti Corruption Bureau (ACB) Satara | बिअर शॉपीच्या परवान्यासाठी 3 लाखाच्या लाचेची मागणी, उत्पादन शुल्कचे तीन अधिकारी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात