Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवून केले गर्भवती; कोथरूडच्या शास्त्रीनगरमधील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध (Physical Relation) ठेवून तिला गर्भवती (Pregnant) करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police) बलात्कार (Rape In Pune), पोक्सो अंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. (Pune Minor Girl Rape Case)

 

प्रशांत धर्मराज जाधव Prashant Dharmraj Jadhav (रा. पोस्टमन कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड – Kothrud Shastri Nagar) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत शास्त्रीनगरमधील एका ३९ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६३/२२) दिली आहे. हा प्रकार शास्त्रीनगर मधील आरोपीच्या घरी व टेरेसवर नोव्हेबर २०२१ ते एप्रिल २०२२ दरम्यान घडला आहे. (Pune Minor Girl Rape Case)

 

फिर्यादी यांची १७ वर्षाची मुलगी हिला प्रशांत जाधव याने आमिष दाखविले. फिर्यादीच्या घरी कोणी नसताना तसेच आरोपीच्या घरी कोणी नसताना त्यांचे घरी व त्याच्या घराचे टेरेसवर जाधव याने त्यांच्या मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले (Pune Crime). हा प्रकार नोव्हेंबर २०२१ पासून सुरु होता. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. हा प्रकार लक्षात आल्यावर तिच्या आईने विचारणा केली. तेव्हा या संबंधाची माहिती तिने आईला दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | Pune Minor Girl Rape Case Kothrud Shastri Nagar Area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा