Pune Minor Girl Rape Case | स्कुल बसचालकाचा बसमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार; रिलेशनशीपमध्ये राहणार का विचारून केला लैंगिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Minor Girl Rape Case | स्कुल बसमधून (School Bus) ये जा करीत असताना १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला रिलेशनशिपमध्ये (Relationship) राहणार का असे विचारुन तिच्यावर वारंवार बलात्कार (Rape In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) सोमेश्वर घुले पाटील Someshwar Ghule Patil (वय ३५, रा. वडाची वाडी, उंड्री) याला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार मार्च, जून आणि १६ जुलै रोजी घडला होता. (Pune Minor Girl Rape Case)

 

याबाबत उंड्री येथे राहणार्‍या एका १५ वर्षाच्या मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७३४/२२) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी ही सोमेश्वर घुले पाटील याच्या स्कुल बसमधून शाळेत ये जा करीत असे. त्या दरम्यान त्यांच्यात ओळख झाली. ती अल्पवयीन असल्याचे माहिती असताना घुले याने तिला रिलेशनशिपमध्ये राहणार का असे विचारले. फिर्यादी हिला रिलेशनशिप म्हणजे काय हे माहिती नसताना तिने होकार दिला. तेव्हा त्याने तिच्याबरोबर मार्च, जून २०२२ मध्ये जबरदस्तीने वेळोवेळी शरीरसंबंध (Physical Relationship) ठेवले. १६ जुलै रोजी ही मुलगी घरी उशिरा आली. तेव्हा तिच्या वडिलांना संशय आला. तेव्हा त्यांनी मुलीकडे सखोल चौकशी केली. (Pune Minor Girl Rape Case)

तिने आपल्यावर चौघांनी बलात्कार (Rape Case) केल्याचे सांगितले. या प्रकाराने तिचे वडिल हादरुन गेले. त्यांनी तातडीने कोंढवा पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी या मुलीकडे चौकशी केली. तेव्हा बसचालकाबरोबर प्रकरण उघड होऊ नये, म्हणून तिने चौघांनी बलात्कार केल्याचे सांगितल्याचे उघड झाले. वैद्यकीय तपासणीत तिचे शारीरीक संबंध आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सोमेश्वर घुले याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक शिंदे (Assistant Police Inspector Shinde) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | School bus driver rapes minor girl in bus;
Sexual assault by asking why I will stay in a relationship

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा