Pune Molestation Case | अश्लील शेरेबाजी व हावभाव करुन महिलेचा विनयभंग, गुरुवार पेठेतील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महिलेकडे पाहून अश्लील शेरेबाजी व हावभाव करुन महिलेचा विनयभंग (Pune Molestation Case) केल्याची घटना गुरुवार पेठेतील कस्तुरी चौकात घडली आहे. याप्रकणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2016 पासून 18 फेब्रुवारी रोजी पहाटे सहाच्या दरम्यान घडला आहे.

याबाबत गुरुवार पेठेत राहणाऱ्या 47 वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन संदीप पळसे, श्रीनिवास पळसे, तीन महिलांवर आयपीसी 354अ, 354ड, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच इमारतीत राहतात.
आरोपी यांनी फिर्यादी यांच्याकडे पाहून अश्लील शेरेबाजी करुन शिवीगाळ केली.
आरोपी संदीप याने फिर्यादी यांना धमक्या देऊन फिर्यादी यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
तसेच महिलेकडे पाहून अश्लील हावभाव केले. रविवारी पहाटे सहाच्या सुमार महिला घराबाहेर साफसफाई करत होते.
त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला. त्याने महिलेला अश्लील स्पर्श करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
तसेच अश्लील बोलून तिचा पाठलाग करुन त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्हि.ए. म्हेत्रे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PSI Suspended In Pune Pimpri | पुणे (पिंपरी) : पाच लाख खंडणी प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित

Manoj Jarange Patil On Maratha Reservation | ‘सगेसोयरे’चा मुद्दा निकाली काढायचा नव्हता, तर अधिवेशनाची गरजच काय? मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जरांगे संतापले

Maratha Reservation | मराठा आरक्षणावर आज महत्वाचा निर्णय, विशेष अधिवेशनात विधेयक मांडणार

ACB Trap Case | सहायक फौजदार लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Asim Sarode On Eknath Shinde | एकनाथ शिंदे औट घटकेचे राजे, उद्धव ठाकरेंना पक्षाचे नाव आणि चिन्ह परत मिळेल : असिम सरोदे

पुणे : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला उंदीर मारण्याचे औषध पाजले, पतीला अटक