Pune : बिबवेवाडीत घरगुती वादातून सासुचा गळा आवळून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  घरगुती वादातून सासूचा गळा वाळून खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. बिबवेवाडी परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी जावयाला अटक केली आहे.

अनारकली महंमद तेरणे (वय 45) असे खून झालेल्या सासूचे नाव आहे. तर याप्रकरणी जावई आसिफ दस्तगीर आत्तार (वय 26) याला अटक केली आहे. याबाबत मौलाली मंजलापुरे (वय 31) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कुटुंब कर्नाटक राज्यातील आहे. ते बिबवेवाडी येथील शेळके वस्तीत चाळीत राहत होते. सासू, पत्नी आणि आरोपी असे एकत्र राहत होते. यावेळी घरातील किरकोळ कारणावरून त्यांचे वाद होत असत. आरोपी हा मिळेल ते काम करत असे.

सततच्या वादातून आरोपीच्या मनात सासूबाबत राग होता. काल (शनिवारी) देखील सकाळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले. यावेळी आरोपीने त्यांना मारहाण करत त्यांचा ओढणीने गळा आवळून खून केला. पोलिसांना तात्काळ याची माहिती देण्यात आली. बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक उसगावकर हे करत आहेत.