Pune MPSC News | महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर केवळ 3 सदस्य असल्याने 5000 उमेदवारांच्या मुलाखती टांगणीला

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर (एमपीएससी) सहा सदस्य असणे बंधनकारक आणि नियमबद्ध आहे. परंतु, गेले अनेक महिने आयोगावर केवळ तीनच सदस्य कार्यरत (Pune MPSC News) आहेत. आयोगाच्या प्रशासकीय कार्यालयात तीन जागा रिक्त आहेत. यामुळे उमेदवार निवडीवर याचा परिणाम झाला आहे. आयोगावर तीन सदस्यांची कमतरता असल्याने तब्बल पाच हजार उमेदवारांच्या मुलाखती रखडल्या आहेत. सदर पाच हजार उमेदवार मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. या सर्वांची विविध पदांसाठी निवड झाली आहे. मुलाखती रखडल्याने स्पर्धापरीक्षार्थींची दीड ते दोन वर्षे वाया गेली आहेत, तर दुसरीकडे शासनाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Pune MPSC News) कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा पास झालेल्या उमेदवारांच्या अंतिम टप्प्यातील मुलाखती घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती तयार केली जाते. या समितीवर आयोगाचा एक सदस्य असणे बंधनकारक आहे. मात्र, आता आयोगाकडे तीन सदस्य असल्याने मुलाखतीसाठी देखील तीनच पॅनेल तयार होऊ शकत आहेत. त्यामुळे मुलाखतींना वेळ लागत आहे. पर्यायाने मुलाखती रखडल्या जात आहे. त्याचे दुरगामी परिणाम उमेदवारांच्या नियुक्त्यांवर होत आहे, तर दुसरीकडे शासनाला देखील योग्य वेळी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकत नाही.

प्रलंबित मुलाखती खालील प्रमाणे:-

सन – 2021, राज्यसेवा – 405 पदे, उत्तीर्ण उमेदवार – 1245

(Year – 2021) सन – 2021, एफएमसी – 63 पदे, उत्तीर्ण उमेदवार – 200

सन – 2020, पोलीस उपनिरीक्षक – 650 पदे, उत्तीर्ण उमेदवार – 2600

(Year – 2021) सन – 2021, पोलीस उप निरीक्षक – 376, उत्तीर्ण उमेदवार – 1504

सन – 2022, राज्यसेवा – 615 पदे, उत्तीर्ण उमेदवार -1845

सन – 2022, पोलीस उप निरीक्षक – 650 पदे, उत्तीर्ण उमेदवार – 2600

आयोगावर रिक्त असलेल्या तीन जागा लवकरात लवकर भराव्यात आणि तीन समित्या (पॅनल) तयार करून रखडलेल्या मुलाखती घ्याव्यात, अशी मागणी परीक्षार्थींनी केली आहे. त्यामुळे आगामी काळात आयोग काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title :- Pune MPSC News | interviews of five thousand candidates stopped as three out of six seats in maharashtra public service commission mpsc are vacant

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shriya Pilgaonkar | श्रिया पिळगावकरची नवी वेब सिरीज चर्चेत; सिरीज मध्ये साकारणार सेक्स वर्करची भूमिका

Pune Crime | प्रेमास नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून कोयत्याने वार, फुरसुंगी परिसरातील घटना

SBI Interest Rate | एसबीआयच्या व्याजदरात कमालीची वाढ