Pune Mundhwa Crime | पुणे : इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून पडून मजूराचा मृत्यू, ठेकेदारावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Mundhwa Crime | नियोजित इमारतीचे बांधकाम करत असताना तिसऱ्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू झाला. हा प्रकार घोरपडी (Ghorpadi) येथील एका बांधकाम साईटवर घडला आहे. याप्रकरणी बांधकाम साईटवरील ठेकेदारावर मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.9) दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडला आहे.(Pune Mundhwa Crime)

इमरान नईम खान (वय-36) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी ठेकेदार इंद्रजीत रॉय व इतरांवर आयपीसी 304(अ), 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सहायक पोलीस फौजदार रामदास यशवंत होले यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनाथनगर घोरपडी एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. मयत इमरान खान हे या
बांधकाम साईटवर प्लॅस्टरचे काम करत होते. दुपारी पावणे दोनच्या सुमारास जेवणाची सुट्टी झाल्याने ते इमारतीवरुन
खाली उतर होते. त्यावेळी त्यांनी बांधकाम केलेल्या वीट बांधकामाला पकडले.
त्यावेळी बांधकामाची वीट निघाल्याने इमरान तिसऱ्या मजल्यावरून खाली पडले.
यामध्ये गंभीर जखमी होऊन इमरान खान यांचा मृत्यू झाला. बांधकाम मजुरांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही साधनसामग्री
न पुरविल्याने ही दुर्घटना घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gyanesh Kumar- IAS Sukhbir Singh Sandhu | ज्ञानेश कुमार, सुखबीर सिंह संधू नवे केंद्रीय निवडणूक आयुक्त, पंतप्रधान समितीकडून निवड

Pune Police MCOCA Action | वारजे माळवाडी परिसरातील गणेश उर्फ गुड्या पटेकर टोळीवर ‘मोक्का’! चालु वर्षातील पुणे पोलिसांची 16 वी कारवाई

Jayant Patil On Modi Ki Guarantee | ‘मोदी की गॅरंटी’वर जयंत पाटील यांची बोचरी टीका, ”चले तो चांद तक, नही तो शाम तक”

Former President Pratibha Patil | माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती स्थिर, उद्या घरी सोडणार