Pune Mundhwa Police Station | मुंढवा पोलिसांची आता सायकलवरुन पेट्रोलींग, पोलिसांचा ‘सायकल पेट्रोलिंग’अनोखा उपक्रम; अरुंद रस्त्यावर गस्त घालण्याची अडचण होणार दूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Mundhwa Police Station | मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आता पोलीस सायकलवरुन गल्ली बोळात पेट्रोलिंग (Police Patrolling) करणार आहेत. त्यामुळे पोलिसांची शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच नागरिकांसोबत अधिकाधिक संपर्क आल्यामुळे त्यांच्यात सुरक्षेची भावना वाढण्यास मदत होणार आहे, असे मत मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे (Senior PI Vishnu Tamhane) यांनी व्यक्त केले आहे. (Pune Mundhwa Police Station)

पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांच्या संकल्पेनेतून ‘सायकल पेट्रोलींग’ (Cycle Police Patrolling In Pune) हा आगळावेगळा पर्यावणपुरक उपक्रम मुंढवा पोलीस ठाण्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (Ranjan Kumar Sharma) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, हडपसर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त आश्विनी राख (Ashwini Rakh) , हडपसर, लोणी काळभोर, वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, स्थानिक उद्योजक व माजी नगरसेवक उमेश गायकवाड (Former Corporator Umesh Gaikwad), नागरिक उपस्थित होते. (Pune Mundhwa Police Station)

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांनी केले. यावेळी ते म्हणाले, पोलीस आयुक्त यांनी पोलीस स्टाफच्या शारीरिक तंदुरुस्तीकडे व गुन्ह्यांना प्रतिबंध करुन नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याबाबत सूचना दिली होती. त्यानुसार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायकल पेट्रोलींग करण्याची संकल्पना सुचली. याबाबत पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासोबत चर्चा केली. त्यावेळी सायकल पेट्रोलींगसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी अरुंद रस्ते, गल्लीबोळाचे रस्ते आहेत. त्यामुळे गस्त घालताना पोलिसांच्या वाहनांना मर्यादा येतात. या पार्श्वभूमीवर सायकलवरुन गस्त घालणे सोपे होणार आहे. गस्तीच्या निमित्ताने प्रत्येक पोलिसाकडून काही अंतर सायकल चालविली जाईल. परिणामी पोलिसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार असल्याचे ताम्हाणे यांनी सांगितले.

सायकल पेट्रोलींग हे पर्यावरणपुरक असल्याने वाहनांमुळे होणारे प्रदुषण टाळता येणार आहे.
तसेच या उपक्रमाकडे नागरिक देखील कुतूहलाने पाहून ते सायकलिंग करण्याकरीता प्रेरित होतील
असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मुंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार
निलेश पालवे, स्वप्निल शिवरकर, तानाजी देशमुख व इतर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी केले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड,
2 गुन्हे उघड

भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा,
100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

Ajit Pawar | पुणे-मुंबई महामार्गावर रोहित पवारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून फ्लेक्स, अजित पवार म्हणाले – ‘मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न…’