मुंबई HC ने फटकारताच पुणे महापालिका खडबडून जागी, वॉररूममधील कॉल सेंटरची यंत्रणाच बदलली

पुणेः पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा म्हणून लोकांचे हाल होत आहे. पण, अशा परिस्थितीत बेड असून सुद्धा उपलब्ध नाही असा सांगण्याचा धक्कादायक प्रकार मुंबई उच्च न्यायालयानेच उजेडात आणत पुणे पालिकेच्या गलथान कारभाराचा पर्दाफाश केला होता. पुण्यातील महापालिकेच्या कोरोना वॉररूमध्ये कसा खोटा प्रकार घडतोय याची पोलखोलच न्यायालयाने केली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पुणे महापालिका प्रशासनाने वॉररूममध्ये कॉल सेंटरवर काम करणा-या यंत्रणेत पुर्णपणे बदल केला आहे. बेड्सची विचारणा करण्यासाठी कॉलरूमध्ये येणारे प्रत्येक फोन कॉल रेकॉर्ड केले जाणार आहे. जेणे करून कोणतीही खोटी माहिती आता दिली जाणार नाही.

.. . अन् थेट न्यायालयातून पुणे महापालिकेला फोन
पुण्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवरून मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान थेट न्यायालयातून बेडसाठी पुणे महापालिकेच्या कंट्रोल रुमला फोन लावण्यात आला. यावेळी कोविडच्या डॅशबोर्डवर 4 व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध असल्याचे दाखवत होते. मात्र, प्रत्यक्षात उपलब्ध असलेल्या बेड्सच्या संख्येत तफावत असल्याचे निदर्शनास आले. यावरुन मुंबई उच्च न्यायालयाने पुणे मनपाला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.