Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेकडून आंबेगाव बु. येथील अनधिकृत 11 इमारतींवर हातोडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation (PMC) झोन दोनमधील आंबेगाव बुद्रुक (Ambegaon Budruk) येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 45 हजार 050 चौरस मीटर क्षेत्र मोकळे करण्यात आले. पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation (PMC) आंबेगाव बु. येथील सिंहगड कॉलेज लगतच्या (Sinhgad College) स. नं. 10 मधील एकूण 11 अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती बांधकाम विकास विभाग झोन दोनच्या कार्यकारी अभियंता यांनी दिली.

आंबेगाव बु. भागातील सिंहगड कॉलेज लगतच्या एकूण 11 अनधिकृत इमारतींवर सुमारे 45 हजार 050 चौ. फुटाचे
अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात आली.
या कारवाईत बांधकाम विकास विभाग, झोन दोन चे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता,
पुणे महानगरपालिकेचे (Pune Municipal Corporation (PMC) अतिक्रमण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस बदोबस्त व पुणे मनपाचे 7 बिगारी, 1 जॉ क्रशर मशिन, 3 जेसीबी, 2 ब्रेकर, 1 गॅस कटर यांच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली.

आंबेगाव बु. परिसरात वारंवार मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात येत आहेत.
त्यामुळे आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
नागरिकांनी सदनिका विकत घेताना इमारतीस पुणे मनपाची बांधकाम परवानगी तसेच महारेरा कडे नोंदणी केल्या
बाबतची खातरजमा करुन सदनिका खरेदी कराव्यात असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला लष्कर पोलिसांकडून अटक