Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेच्या इमारतींमधील अतिक्रमण रोखण्यासाठी सीसीटीव्हीची नजर; …तर संबंधित अधिकाऱ्यावर होणार कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) | आर्थिक दुर्बल (EWS) आणि आर – 7 या आरक्षणांतर्गत महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) ताब्यात आलेल्या सदनिकांचा गैरवापर टाळण्यासाठी आणि अतिक्रमण रोखण्यासाठी महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या ताब्यात असलेल्या सदनिकांमध्ये होणारी अनधिकृत घुसखोरी रोखण्यासाठी सीसीटीव्ही (CCTV) लावावेत, सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी, अशा सूचना अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी मालमत्ता विभागाला दिल्या आहेत.

याशिवाय अतिक्रमण निरीक्षकाने आठवड्यातून एकदा या सदनिकांची पाहणी करावी. त्यानंतर अतिक्रमण झाले तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे (Additional Municipal Commissioner Vikas Dhakne) यांनी दिला आहे. आर्थिक दुर्बल आणि आर – 7 या आरक्षणांतर्गत महापालिकेला शहराच्या विविध भागातील प्रकल्पांमध्ये सदनिका मिळाल्या आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)

महापालिकेला मिळालेल्या एकूण सदनिकांची संख्या 3 हजार 908 आहे. त्यापैकी 1 हजार 904 सदनिकांचे वाटप करण्यात आले आहे. विविध प्रकल्पांसाठी 135 तर क्षेत्रिय कार्यालयाकडे वर्ग केलेल्या 448 सदनिका आहेत. महामेट्रोला 334 सदनिका दिल्या आहेत, तर उर्वरित 1 हजार 087 सदनिका पडून आहेत. औंध येथे 153, धनकवडीमध्ये 2, एरंडवणा 44, कात्रज 31, वडगाव बुद्रुक 25, बोपोडी 7, हडपसर 1, वडगाव शेरी 30, कात्रज 48, खराडी 165, धायरी 6, हडपसर 53, बिबवेवाडी 16, हडपसर स.नं. 132, 167 अ 537 अशा सदनिका शिल्लक आहेत.

महापालिकेच्या सदनिकांमध्ये अतिक्रमण केले जाते किंवा तोडफोड केली जाते.
या पार्श्वभूमीवर नवनियुक्त अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी गुरुवारी मालमत्ता विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीमध्ये त्यांनी सदनिकांची माहिती घेऊन ताब्यात असलेल्या सदनिकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक
(Security Guard) नेमण्याचे आदेश दिले. तसेच या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यास सांगितले.
या सदनिकांना संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण निरीक्षकांनी आठवड्यातून एकदा पाहणी करावी.
जर एखाद्या सदनिकेमध्ये अतिक्रमण झाले तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल,
असा इशारा विकास ढाकणे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिला आहे.

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | CCTV eyes to prevent encroachment in Pune Municipal Corporation buildings; … then action will be taken against the concerned officer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Udayanraje Bhosale | उदयनराजे भोसले यांचा भाजपबाबत नरमाईचा सूर

Teachers Exam | शिक्षणाचा दर्जा ढासळल्यानं आता शिक्षकांचीच परीक्षा होणार, विभागीय आयुक्तांचा निर्णय

Sushma Andhare | ‘भाजप माझी हत्या करणार आहे का?’ – सुषमा अंधारे