Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेच्या शहरी गरीब आरोग्य योजनेतील वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाखांवरून 1 लाख 60 हजार रुपयापर्यंत वाढणार

आरोग्य विभागाकडून स्थायी समिती पुढे प्रस्ताव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेने तब्बल 13 वर्षांनी शहरी गरीब योजनेच्या (Shahari Garib Yojana) लाभार्थ्यांच्या उत्पन्नाच्या (Income) अटींमध्ये बदल केल्याने या योजनेचा लाभ आणखी काही हजार पुणेकरांना होणार आहे. महापालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) आतापर्यंतची 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवून वार्षिक उत्पन्न 1 लाख 60 हजार रुपये असणार्‍या महापालिका हद्दीत राहाणार्‍या पुणेकरांचा या योजनेमध्ये समावेश केला आहे. तसेच रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यानंतर पॅनलवरील संबधित रुग्णालय प्रशासनालाच शहरी गरीब कार्डची ऑनलाईन खातरजमा करून महापालिकेकडून ऑनलाईन परवानगी घ्यावी लागणार असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांच्या महापालिकेतील फेर्‍या देखील थांबणार आहेत.

महापालिकेच्यावतीने (Pune Municipal Corporation (PMC) 2010 पासून शहरी गरीब आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांच्या आतमध्ये असलेल्या पुणे महापालिकेच्या हद्दीतील रहीवाशांना एक लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य उपचार (Health Treatment) आणि औषधे (Medicines) मिळतात. 2018 मध्ये किडनी (Kidney), हृदयविकार (Heart Disease) आणि कॅन्सरवरील (Cancer) उपचारासाठी ही मर्यादा दोन लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. मागील 13 वर्षांमध्ये योजनेअंतर्गत एक लाखांहून अधिक पुणेकरांवर उपचार करण्यात आले आहेत. बनावट कागदपत्रांचा आणि उत्पन्नाच्या दाखल्यांचा वापर करून या योजनेचा लाभ घेतला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने या योजनेसाठी कार्ड काढण्याची ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे. यामुळे विशेषत: तहसील कार्यालयाकडून दिल्या जाणार्‍या उत्पन्न व अन्य दाखल्यांची पडताळणीची सोय उपलब्ध झाली आहे.

मात्र, मागील काही वर्षांमध्ये किमान कायद्यानुसार वेतनात वाढ होत गेल्यानंतरही एक लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची अट कायम तशीच होती. उपचाराचे शासकिय दर आणि खाजगी रुग्णालयातील उपचारांचे दर वाढत असताना दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न असलेल्या नागरिकांना उपचार घेणे परवडत नाही. दुसरीकडे या योजनेतही सहभागी होता येत नाही. या पार्श्‍वभूमीवर या योजनेत सहभागी होण्यासाठीची उत्पन्न मर्यादा वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार वार्षिक उत्पन्न 1 लाख 60 हजार रुपये असलेल्या पुणेकरांना या योजनेमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे (Standing Committee) ठेवण्यात आला.

उत्पन्न मर्यादेसोबतच या योजनेच्या नियमांत काहीसा बदल करण्यात आला आहे.
या बदलानुसार पॅनलवरील एखाद्या रुग्णावर राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत
(Mahatma Phule Jan Arogya Yojana) उपचार करण्यात येत असल्यास प्रथम त्या योजनेनुसार लाभ देण्यात यावा.
काही कारणास्तव महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ न मिळाल्यास संबंधित रुग्णालयाने तसे ऑनलाईन महापालिकेला कळवणे बंधनकारक राहणार आहे. रुग्ण दाखल झाल्यानंतर संबधित रुग्णालयांनी संबधित रुग्णाचे शहरी गरीब कार्ड ऑनलाईन तपासून महापालिका प्रशासनाची ऑनलाईन पूर्व मान्यता घेणे बंधनकारक राहाणार आहे. या योजनेसाठी बोगस कागदपत्र दिल्याचे आढळल्यास संबधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असून या योजनेचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याचे प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये शहरी गरीब कार्डसाठी आतापर्यंत 11 हजार 591 अर्ज आले असून
त्यापैकी 9 हजार 809 अर्जदारांना कार्ड देण्यात आले आहेत.
वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत वाढविल्यास अर्जांची आणि कार्डधारकांची
संख्या 40 ते 50 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
थोडक्यात आणखी पाच हजार पुणेकर नागरिकांचा समावेश या योजनेत होण्याची शक्यता असल्याचे मत
महापालिकेच्या आरोग्य अधिकार्‍याने (Health Officer) व्यक्त केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation Protest | ‘भाजपने मराठा समाजाची माफी मागावी’,
सुप्रिया सुळेंच्या मागणीवर चित्रा वाघ यांचा पलटवार, म्हणाल्या-‘तुम्ही खरंच प्रयत्न केले असते तर…’

Jalna Lathi Charge | जालना लाठीचार्जवर राज ठाकरे म्हणाले ‘मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी…’

Retired ACP Anis Kazi Passed Away | सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त अनिस काझी यांचे निधन