Pune Municipal Corporation (PMC) | उरुळी देवाची व फुरसुंगी टी.पी. स्किम बाह्यवळण मार्गाची रुंदी कमी करण्याच्या हरकती, सूचनांवर लवकरच सुनावणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) | उरुळी देवाची (Uruli Devachi) व फुरसुंगी (Fursungi) टीपी. स्कीम मधील (T.P. Scheme) बाह्य वळण मार्गाची रुंदी 110 मी. हून कमी करून 65 मी. करण्यासाठी मागविण्यात आलेल्या हरकती (Objections) व सूचनांवर (Suggestions) सुनावणी घेऊन अंतिम अहवाल राज्य शासनाकडे (State Government) पाठविण्यासाठीचा प्रस्ताव महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) शहर सुधारणा समितीपुढे ठेवण्यात आला आहे.

 

महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) हद्दीमध्ये चार वर्षांपुर्वी समाविष्ट करण्यात आलेल्या उरुळी देवाची व फुरसुंगी या गावांमध्ये महापालिकेच्यावतीने टी.पी.स्किम द्वारे विकास करण्याची प्रक्रिया मार्च 2019 पासून सुरू करण्यात आली आहे. दरम्यान यापुर्वी जाहीर केलेल्या इराद्यामध्ये या दोन्ही गावांच्या मध्यातून जाणार्‍या बाह्यवळण मार्गाची रुंदी 110 मी. होती. परंतू  रस्तारुंदीसाठी आवश्यक जागेची प्रकरणे न्यायालयात असून न्यायालयीन प्रक्रिया (Court Proceeding) दिर्घ काळ सुरू राहाण्याची शक्यता आहे. यामुळे टी.पी.स्किमला वेळ लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने बाह्यवळण मार्गाची (Bypass) रुंदी 110 मी. वरून 65 मी. पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांच्या हरकती आणि सूचनाही मागवल्या आहेत.
रस्ता रुंदी बदलावर उरुळी देवाची मधील टी.पी. स्किम योजना क्र. 6 वर 55 हरकती व सूचना आल्या आहेत.
तर फुरसुंगीमधील योजना क्र. 9 वर 155 हरकती व सूचना आल्या आहेत.
या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन अंतिम अहवाल तयार करून शहर सुधारणा समिती आणि
मुख्य सभ्येच्या मान्यतेने तो शासनाच्या नगर रचना विभागाकडे (Town Planning Department) सादर करण्यात येणार आहे.
या प्रक्रियेला मान्यता देण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाने शहर सुधारणा समितीपुढे ठेवला आहे.
यापैकी उरूळी देवाची येथील योजना क्र. 6 ही 109. 78 हेक्टरवर राबविण्यात येणार असून योजना क्र.9 ही 260.67 हेक्टर क्षेत्रावर राबविली जाणार आहे.

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | Uruli Devachi and Fursungi TP scheme Objections to reduce the width of the scheme bypass, hearing on suggestions soon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau (ACB) Thane | 7 हजाराची लाच घेताना तालुका कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

 

Mukesh Ambani News | मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओचा दिला राजीनामा, आकाश अंबानी बनले कंपनीचे चेअरमन

 

Maharashtra Political Crisis | “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील..! ‘एकनाथ शिंदे आमदार शहाजीबापूंना म्हणाले ‘Once More’