Pune : नवले ब्रिजजवळ पोत्यात हात-पाय बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचे गुढ उकलले, अनैतिक संबंधातून खून झाल्याचं स्पष्ट

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातील नवले ब्रिजजवळ खून करून पोत्यात हात-पाय बांधून टाकलेल्या त्या मृतदेहाचे गूढ उकळण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाला आहे. पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

अमर क्षीरसागर (वय 22, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर रोहिदास पाटोळे (वय 45, रा. कात्रज) याला पकडण्यात आले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

मिळालेल्या माहितीनुसार, अमर हा पालिकेत काँट्रॅक्ट बेसवर नोकरी करत होता. त्याच्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्याच महिलेसोबत आरोपीचे देखील संबंध होते. त्यातून या दोघांचे वाद सुरू होते. या कारणावरून आरोपीने त्याचा खून केला. तसेच मृतदेह पोत्यात घालून फेकून दिले होता.
चार दिवसांपूर्वी नवले ब्रिजजवळ एका पोत्यात हात-पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्याची ओळख पटलेली नव्हती. त्याचा तपास सुरू असताना भारती विद्यापीठ पोलिसांनी प्रथम ओळख पटवली. त्यानंतर दोन दिवसात या गुन्ह्यांची उकल केली आहे.