पुण्याच्या महापौरांचा कोणत्या शहराचे महापौर म्हणून गिरीश महाजनांनी उल्लेख केला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील पर्वती जल शुद्धीकरण केंद्राच्या ५०० एमएलडी प्रकल्पाचे उदघाटन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी महापौर मुक्ता टिळक,खासदार अनिल शिरोळे,आमदार माधुरी मिसाळ यांची भाषणे झाली.त्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भाषणाला सुरुवात केली.त्यांनी सुरुवातीला नाशिक शहराच्या महापौर मुक्ता टिळक आणि नागपूर महापालिका आयुक्त सौरभ राव असा उल्लेख केला.या दोघांचा उल्लेख ऐकून व्यासपीठावरील मान्यवरांसह सभागृहातील नागरिक अवाक झाले. त्यानंतर लगेच महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या नागपूर नाही पुणे आहे. त्यावर महाजन म्हणाले की,सौरभ राव अगोदर नागपूरचे देखील आयुक्त होते.म्हणून बोलो आणि दररोज अनेक ठिकाणी कार्यक्रम होतात. त्यातून असे झाले.असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.