Pune Navale Bridge Accident | वाहनाच्या धडकेत टेम्पो पलटी, तरुणाचा मृत्यू; नवले ब्रिज जवळील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Navale Bridge Accident | पुण्यातील मुंबई-बेंगलोर हायवेवरील (Mumbai-Bangalore Highway) नवले ब्रिज परिसर अपघाताचा हॉटस्पॉट बनला आहे. या परिसरात लहन-मोठे अपघात सतत होत असतात. बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनाने टेम्पोला धडक दिल्याने टेम्पो पलटी होऊन हा अपघात झाला. (Pune Navale Bridge Accident)

अली मोहम्मद यार मोहम्मद (वय-21 रा. उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत महिहुद्दीन मुखीमुल्ला खान (वय-36 रा. आचार गल्ली, शिळफाटा, कौसा मुंब्रा, जि. ठाणे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अज्ञात वाहनावरील चालकावर आयपीसी 304अ, मोटार वाहन कायदा (Motor Vehicle Act) कलम 184, 134अ,ब, 119, 177 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Navale Bridge Accident)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे टेम्पो घेऊन साताऱ्याकडे जात असताना नवले ब्रिज जवळ असलेल्या ओंकार इन हॉटेलसमोर टेम्पो थांबवला होता. फिर्यादी यांचा कामगार लघुशंका करण्यासाठी जात असताना अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने, हलगर्जीपणाने भरधाव वेगात चालवून फिर्यादी यांच्या टेम्पोला पाठीमागुन जोरात धडक दिली. यामध्ये टेम्पो पलटी होऊन फिर्यादी यांचा कामगार अली मोहम्मद याच्या अंगावर पडला. अली मोहम्मद हा टेम्पो खाली दबला गेल्याने गंभीर जखमी झाला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Accident News | पुणे : प्रेमविवाहाची इच्छा अधुरी, संसार थाटण्यापूर्वीच काळाचा घाला; ट्रक अपघातात जोडीदाराचा मृत्यू तर तरुणी गंभीर जखमी

Pune Crime News | कन्सलटन्सी कंपनीतील महिलेचा विनयभंग, डेक्कन परिसरातील प्रकार

ACB Trap News | 45 हजार रुपये लाच घेताना महावितरण कंपनीचा कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात