Pune NCP | कोथरूड युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या व आढावा बैठक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे राष्ट्रवादी (Pune NCP) युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदारसंघाची (Kothrud Assembly Constituency) आढावा बैठक व पद नियुक्ती कार्यक्रम पार पडला. माजी उपमहापौर दीपक मानकर (Former Deputy Mayor Deepak Mankar), शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP City President Prashant Jagtap), राष्ट्रवादी कोथरूड अध्यक्ष हर्षवर्धन मानकर (Harshvardhan Mankar), युवक शहर अध्यक्ष किशोर कांबळे (Kishor Kamble), बंडू केमसे ,सनी मानकर असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी (Pune NCP) युवक कोथरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष गिरीश गुरुनानी (Girish Gurunani) यांच्या अध्यक्षतेखाली कोथरूड युवक राष्ट्रवादीच्या अनेक पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या कार्यक्रमास युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माध्यमांशी बोलत असताना गुरुनानी यांनी दीपक मानकर, प्रशांत जगताप व किशोर कांबळे यांचे अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याबद्दल आभार मानले. तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी गुरुनानी म्हणाले, समाजात वावरत असताना समाजातील लोकांच्या समस्या जाणून घेणे हाच एका राष्ट्रवादी (Pune NCP) युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा निर्धार असायला हवा. त्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आपण नेहमी अग्रेसर असायला हवे. या बद्दलचे मार्गदर्शन करायला आपले वरिष्ठ पदाधिकारी आहेतच. त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा पुरेपूर फायदा घेऊन समाजातील लोकांची अधिकाधिक मदत कशी करता येईल हे आपण बघितले पाहिजे. पद मिळाल्यानंतर काम थांबत नाही तर तिथून खरे काम सुरू होते. सर्वांना एकजुटीने काम करण्याचे आव्हान केले.

मोहित बराटे (Mohit Barate), विनायक गायकवाड (Vinayak Gaikwad) यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले व निलेश शिंदे (Nilesh Shinde) यांनी सूत्रसंचालन केले.

 

Web Title :- Pune NCP | Appointment and review meeting of Kothrud Youth NCP office bearers

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा