Gopichand Padalkar | ‘शरद पवार ज्येष्ठ पण श्रेष्ठ नाहीत, देवेंद्र फडणवीस असे 10-20 पवार खिशात घालून फिरतात’ – गोपीचंद पडळकर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Gopichand Padalkar | पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल (Election Result) लागला आहे. यामध्ये भाजपने चार राज्यात यश मिळवलं आहे. मात्र पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (AAP) भाजप आणि काँग्रेसचा (Congress) सुफडा साफ केला आहे. चार राज्यात सत्ता पुन्हा मिळवल्यावर भाजपमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आज महाराष्ट्रातील अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवरून जाताना ठाकरे सरकारमधील (Thackeray Government) नेत्यांवर निशाणा साधला. त्यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे.

 

शरद पवार ज्येष्ठ आहेत पण श्रेष्ठ नाहीत. काही केलं तरी मीच केलं आणि माझ्या पुढे कोणी जाऊ नये, अशी त्यांची भूमिका असते. मात्र देवेंद्र फडणवीस असे 10 –  20 पवार खिशात घालून फिरतात. त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रगल्भ फडणवीसच असल्याचं म्हणत गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पवारांवर टीका केली आहे.

 

विश्वासघातकीपणा, गद्दारीपणा, लबाडीपणा, राष्ट्राच्या विरोधात भूमिका जी शरद पवारांकडे आहे. त्यांच्या पुढचं नेतृत्त्व करण्याची ताकद देवेंद्र फडणवीसांची असल्याचंही पडळकर म्हणाले. विधीमंडळाच्या पायऱ्यांवरून जाताना भाजपच्या (BJP) नेत्यांनी, उत्तर प्रदेश (Uttar Prasdesh) झांकी है, महाराष्ट्र (Maharashtra) बाकी है, अशा घोषणा दिल्या.

 

दरम्यान, मुंबईमध्ये (Mumbai) गोव्यातील विजयाचं सेलिब्रेशन (Celebration) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत करण्यात आलं.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar),
आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांच्यासह आणखी काही नेते उपस्थित होते. त्यावेळी गोपीचंद पडळकरही सामील झाले होते.

 

Web Title :- Gopichand Padalkar | bjp leader and mla gopichand padalkar on ncp sharad pawar devendra fadnavis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा