Pune NCP Meeting | पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची 23 व्या मासिक कार्यकारणी बैठकीत शरद पवार यांना एकमुखी पाठिंबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP Meeting | पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची २३ वी मासिक कार्यकारणी बैठक आज नेहरू आर्ट गॅलरी, घोले रोड शिवाजीनगर पुणे येथे संपन्न झाली. बैठकीत शरद पवार (Sharad Pawar) यांना एकमुखी पाठिंबा देण्यात आला आहे. (Pune NCP Meeting)

आजच्या या बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ३ महत्वपूर्ण ठराव संमत केले,यात प्रामुख्याने लोकनेते आदरणीय खासदार शरद पवार हेच पक्षाचे नेतृत्व असल्याचा ठराव पुणे शहर कार्यकारिणीने एकमताने संमत केला. तसेच उद्या होणाऱ्या कार्यकारणीच्या बैठकीसाठी हजारोंच्या संख्येने पदाधिकारी पुणे शहरातून मुंबई येथे जाणार आहेत. प्रदेश कार्यकारणीने पाठवलेल्या आराखड्यानुसार लाखोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्र पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालयाला पाठवणार आहे. (Pune NCP Meeting)

या या बैठकी प्रसंगी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap NCP) म्हणाले की,”देशाचे लोकनेते आदरणीय खासदार शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आजवर महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी व औद्योगिक या सर्व क्षेत्रांमध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपले भरीव योगदान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष आणि या पक्षाचे आम्ही सर्व सामान्य कार्यकर्ते आदरणीय पवार साहेबांच्या छत्रछायेखाली कायम सामाजिक प्रश्नांसाठी लढत आलो आहोत. आज काही मत-भिन्नता असल्याने पक्षातील काही सन्माननीय सदस्यांनी वेगळी वाट निवडली असली तरी ८३ वर्षाच्या या योध्याला सोडून कुठलाही दुसरा विचार करणे आम्हाला शक्य नाही. कालांतराने पक्षातील हे समज-गैरसमज दूर होतील. परंतु आज मात्र आम्ही सर्व आदरणीय पवार साहेबांच्या सोबत आहोत आणि कायम स्वरूपी राहणार आहोत.

राज्यातील शिंदे -फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Govt) राज्यातील प्रश्न सोडवण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यातील शेतकरी, नोकरदार, अल्पभूधारक, अल्प उत्पन्न गटातील नागरिक व सर्वसामान्य जनता अनेक अडचणींना सामोरे जात असताना विरोधीपक्ष म्हणून सर्वसामान्य नागरिकांची बाजू मांडण्याची काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत आहे.राज्यातील जनतेच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विविध आंदोलने करून सातत्याने आवाज उठवत आहे व या पुढेही उठवत राहील.

या बैठकीला खासदार वंदनाताई चव्हाण, ज्येष्ठ नेते माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे, जयदेवराव गायकवाड, कमलनानी ढोले पाटील, अंकुशआण्णा काकडे, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, प्रकाशआप्पा म्हस्के, भगवानराव साळुंखे, रवींद्रआण्णा माळवदकर, माजी उपमहापौर निलेश मगर,निलेश निकम, विरोधी पक्षनेत्या दिपालीताई धुमाळ, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.सुनील जगताप, मा.नगरसेवक सतीश म्हस्के, काकासाहेब चव्हाण, प्रदीप गायकवाड, बाळासाहेब धनकवडे, श्रीकांत पाटील, वनराज आंदेकर,संतोष फरांदे, युवक अध्यक्ष किशोर कांबळे, युवती अध्यक्ष सुषमा सातपुते, महिला अध्यक्षा मृणालिनीताई वाणी , मा.जि.सदस्य अनिताताई इंगळे, यांच्यासह सर्व सेलचे शहराध्यक्ष , कार्याध्यक्ष व कार्यकारणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title : Pune NCP Meeting | Unanimous support to Sharad Pawar in the 23rd monthly executive meeting of Pune city NCP

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik NCP News | नाशिकमध्ये संघर्ष पेटला, भूजबळ-अजित पवार-शरद पवार समर्थक आमने-सामने; पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरुन राडा

Ajit Pawar | ‘म्हणून मी सरकारमध्ये आलो…’, कॅबिनेटनंतर अजित पवारांच्या विधानाची चर्चा

Actor Ajay Devgn | अभिनेता अजय देवगनची मुंबईमध्ये प्राईम लोकेशनला मोठी गुंतवणूक; किंमत ऐकून व्हाल धक्क

Actress Janhvi Kapoor | अभिनेत्री जान्हवी कपूर पापाराझींसमोर करत होती अंग झाकण्याचा प्रयत्न; फोटो व्हायरल

Maharashtra Politics News | बहुमत असताना राष्ट्रावादीला सत्तेत का घेतलं? शिवसेना नेत्याने सांगितले कारण

Actress Ameesha Patel | बॉलीवुडच्या एका निर्मात्यासोबतच्या अफेअरने बर्बाद केले अमिषा पटेलचे पूर्ण करिअर; आता होतोय पश्चाताप

Actress Rekha | अभिनेत्री रेखा यांनी 10 वर्षे का स्विकारली नाही कोणत्याही चित्रपटाची ऑफर? रेखाजींनी दिले उत्तर

Maharashtra Cabinet Decision | राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर, महाराष्ट्र ठरले पहिले राज्य; अजित पवार उपमुख्यमंत्री होताच पहिली कॅबिनेट बैठक, घेतले 8 महत्त्वाचे निर्णय