Pune NCP | शंभर रूपयांत नाही मिळत किट हिच भाजपची फसवणुकीची रित, राष्ट्रवादीचा राज्य सरकारवर हल्लाबोल

पुणे :पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP | महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारने (Shinde – Fadnavis Government) दिवाळीनिमित्त (Diwali) जाहीर केलेल्या “शंभर रुपयात किराणा किट” या फसव्या योजनेच्या निषेधार्थ व अन्नधान्य वितरण व्यवस्था पुन्हा पूर्ववत सुरू करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (Pune NCP) वतीने दांडेकर पुल येथे आंदोलन (Agitation) करण्यात आले.

मोठमोठी आश्वासनं देवून ती पूर्ण न करणाऱ्या या भाजपवाल्यांनी (BJP) नेहमीप्रमानेच यावेळीही राज्यातील जनतेला फसविलेच आहे. दिवाळी सुरू होवून सुध्दा अजूनही कार्डधारकांना धान्य मिळालेले नाही. शंभर रुपयात किराणा किट ची घोषणा केली, पुरवठादाराने किराणा किट उपलब्ध देखील करून दिल्या परंतु या किटवर फसवणुकीचे बोधचिन्ह असणाऱ्या शिंदे -फडणवीस यांचा फोटो नसल्यामुळे या किट वितरित करण्यात आल्या नाही. अखेर गरिबांना दिवाळीच्या एक दिवस अगोदर देखील संबंधित किट मिळालेल्या नाहीत.

प्रगत व विकसित समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. एकीकडे ओला दुष्काळ (Wet Drought) सदृश्य परिस्थिती आहे, गेल्या दोन वर्षात कोविडमुळे दिवाळी आनंदाने व उत्साहात साजरी करता आली नव्हती यावर्षी ती आनंदात साजरी करता येणार अशी खोटी आश्वासने देत शिंदे- फडणवीस सरकारने ही लोकप्रिय घोषणा केली. परंतु आजही गरिबांना संबंधित किट मिळू शकलेले नाही.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (Pune NCP) या गोष्टीचा निषेध करते.

महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात कडक लॉकडाऊन असताना देखील सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था अत्यंत सुनियोजितपणे सुरू होती.
या सरकारने लोकप्रिय घोषणांच्यापायी संबंधित व्यवस्था बिघडवली असून जी काही आश्वासने दिली होती ती देखील
यांना पूर्ण करता आली नाहीत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सदर याचा निषेध व्यक्त केला.
तसेच येत्या दोन दिवसात सार्वजनिक धान्य वितरण प्रणाली पुन्हा पूर्ववत सुरू न झाल्यास पालकमंत्र्यांना काळे झेंडे
दाखविण्यात येतील असा इशारा दिला.

यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप (City President Prashant Jagtap), प्रवक्ते प्रदीप देशमुख
(Spokesperson Pradeep Deshmukh), संतोष नांगरे (Santosh Nangre), मृणालिनी वाणी
(Mrinalini Vani), प्रिया गदादे (Priya Gadade), विपुल मैसुरकर (Vipul Mysurkar), बाळासाहेब अटल
(Balasaheb Atal), विजय बागडे (Vijay Bagde), समीर पवार (Sameer Pawar), शशिकला कुंभार
(Sasikala Kumhar), अमोल ननावरे (Amol Nanavare), मोनहाज शेख (Monhaj Sheikh),
संजय दामोदरे (Sanjay Damodare), राहुल गुंड (Rahul Gund), प्रदीप शिवशरण
(Pradeep Shivsharan), शिवम ईभाड (Shivam Ebhad), संकेत शिंदे (Sanket Shinde) व
इतर प्रमुख मोठ्या संख्येने हजर होते.

Web Title :-  Pune NCP | Not getting a kit for 100 rupees is BJP’s way of cheating, NCP will attack the state government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kishori Pednekar | घर फिरले की घराचे वासे फिरतात, पण शिवसेनेत मात्र वासे पहिले फिरले आणि आता…, किशोरी पेडणेकरांची ठाकरे-शिंदे-फडणवीसांवर टीकास्त्र

Ajit Pawar | ठाकरे-शिंदे-फडणवीस भेटीवर अजित पवार म्हणाले -‘त्यांनी एकत्र…’

Fish Oil Benefits | हिवाळ्यात हृदयरोगापासून डोळ्यांची दृष्टी वाढवण्यापर्यंत, ‘या’ 4 आरोग्य समस्यांमध्ये लाभदायक आहे माशाचे तेल; जाणून घ्या