Pune News : एक्सप्रेस हायवेवर कार -ट्रकचा भीषण अपघात, 4 जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन  –   मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला असून त्यात कारमधील चौघे जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे़ आज सकाळी हा अपघात घडला.

मुंबई -पुणे एक्सप्रेस महामार्गावर आज मोठ्या प्रमाणावर धुके पडले असून काही अंतरावरील वाहने दिसून येत नव्हती. त्यात ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश कमी होता. मुंबईच्या दिशेने एक ट्रक चालला जाता़ त्यावेळी पाठीमागून आलेल्या अतिशय वेगाने आलेल्या कारचालकाला पुढील ट्रक दिसला नाही. त्यामुळे कारने पाठीमागून ट्रकला जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, संपूर्ण कार ट्रकच्या मागच्या बाजूला शिरली. त्यात चौघे जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यातील दोघे जण गंभीर जखमी आहेत.

महामार्गावरील देवदूत पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरील ही वाहने क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.