Pune News : चतुःश्रृंगी परिसरात पार्किंगमधील 4 दुचाकींची जाळपोळ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात तोडफोड अन जाळपोळ सत्र थांबत नसून, पुन्हा चतुःश्रृंगी परिसरात अज्ञाताने पार्किंगमधील चार दुचाकी जाळल्याची घटना घडली आहे. पेट्रोल चोरीच्या उद्देशाने दुचाकींची जाळपोळ झाल्याची शक्यता आहे. यात मात्र सर्वसामान्य नागरिक भरडले जात आहेत.

याप्रकरणी भाऊसाहेब कारभारी घोडके (वय 36) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात चतु:र्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पाषाण येथे सुतारवाडी परिसरात धोंडे बिल्डिंगमध्ये राहण्यास आहेत. त्यांनी बेसमेंटमध्ये नेहमी प्रमाणे दुचाकी पार्क केल्या होत्या. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दोघेजण पार्किंगमध्ये शिरले. तसेच त्यांनी फिर्यादी व इतरांच्या दुचाकी पेटवून दिल्या. यात चारही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. अधिक तपास चतु:शृंगी पोलिस करत आहेत. पेट्रोल चोरी करण्याच्या उद्देशाने चोरटे आले व त्यांनी दुचाकी जाळल्या असा अंदाज व्यक्त केला जात आहे.