महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी प्रलंबित पेन्शन प्रकरणांवरून खातेप्रमुखांना धरले धारेवर
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | अनेकवर्षे सोबत काम करणारे सहकारी निवृत्त झाल्यानंतर त्यांना पेन्शन व अन्य देणी देण्याची प्रक्रिया करण्याबाबत प्रशासनातील काही मंडळीच फारसे उत्सुक नसल्याचे महापालिकेत पाहायला मिळत आहे. प्रलंबित पेन्शनच्या प्रकरणांबाबत चर्चा करण्यासाठी वरिष्ठांनी बैठक बोलविल्यानंतरही त्याकडे पाठ फिरवत असल्याचा प्रकार नुकतेच समोर आला. यामुळे संतप्त झालेल्या वरिष्ठांनी सर्वच विभागप्रमुखांना ७ सप्टेंबरपर्यंत अधिकाअधिक पेन्शन प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश काढले आहेत. (Pune News)
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी नुकतेच प्रलंबित पेन्शन प्रकरणांबाबत सर्वच विभागातील अधिकार्यांची ऑनलाईन बैठक घेतली. विशेष असे की, अनेक खातेप्रमुखांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. यामुळे संतप्त झालेल्या अतिरिक्त आयुक्तांनी सर्वच विभाग प्रमुखांना खरमरीत आदेश दिले आहेत. त्यामध्ये सर्वच खातेप्रमुखांनी पुढील सात दिवसांत अधिकाअधिक प्रलंबित पेन्शन प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश दिले. ज्या खात्यांकडे १० किंवा त्यापेक्षा जास्त प्रकरणे प्रलंबित आहेत, त्या खातेप्रमुखांनी पेन्शन प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. सात दिवसांत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल ७ सप्टेंबरपर्यंत कामगार कल्याण विभागाकडे सादर करावा. यानंतरही ज्या खातेप्रमुखांकडे १० किंवा त्यापेक्षा जास्त पेन्शन प्रकरणे प्रलंबित आहेत त्यांनी ८ सप्टेंबरला दुपारी साडेचार वाजता अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयात हजर राहाण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. (Pune News)
महापालिका शिक्षण मंडळासह महापालिकेचे सर्व विभाग, झोनल कार्यालये आणि क्षेत्रिय कार्यालयांकडील
पेन्शनची ५६४ प्रलंबित आहेत. यामध्ये सर्वाधीक प्रकरणे प्राथमिक शिक्षण विभाग (११५),
त्याखालोखाल पाणी पुरवठा विभाग (४१), आरोग्य विभाग (३७), कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालय (३२),
येरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय (२३), औेंध बाणेर आणि बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाची प्रत्येकी २२, शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय (२०), अग्निशामक दल आणि शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रिय कार्यालयाची प्रत्येकी १९ प्रकरणे असा क्रमांक लागतो.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Jalna Lathi Charge | जालना लाठीचार्जवर राज ठाकरे म्हणाले ‘मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी…’
Retired ACP Anis Kazi Passed Away | सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त अनिस काझी यांचे निधन
Thane Crime News | माजी महापौराच्या भावाने गोळी झाडून पत्नीचा केला खून; त्यानंतर भावाचाही मृत्यु